Arrest | (Representative Image)

दिल्ली (Delhi) मध्ये एका 37 वर्षीय महिलेला आलिशान हॉटेल मध्ये 15 दिवस फूकट राहिल्याने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी तिच्याकडे पेमेंट बद्दल चौकशी केली तेव्हा तिने त्यांना मारहाण करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मीडीया रिपोर्ट्सनुसार या महिलेचं नाव Jhansi Rani Samuel आहे. ती आंध्रप्रदेशची रहिवासी आहे. 13 डिसेंबरला तिने हॉटेल बूक केले होते. Aerocity येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अॅपद्वारे बनावट UPI पेमेंट करून 5 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेला दिल्लीत अटक करण्यात आली. महिलेने 30 डिसेंबर रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाजवळील पुलमन हॉटेलमध्ये तपासणी केली आणि 15 दिवस राहिली. त्यानंतर हॉटेलने तिच्याविरुद्ध आयजीआय विमानतळ पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली.

पोलिस ऑफिसरच्या माहितीनुसार, Pullman Hotel च्या प्रशासनाने ने Samuel ने आर्थिक व्यवहारासाठी fraudulent payment चा वापर केल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महिलेने कर्मचार्‍यांसोबत चूकीचं वर्तन केल्याचा आरोप केला आहे. PhonePe Fraud: फोनपेद्वारे लोकांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग; कदाचित आपणही अडकाल अशा सायबर चोरांच्या जाळ्यात, Watch Video .

पोलिसांनी महिलेवर कलम 420 फसवणूकीचा गुन्हा दाखल एला आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची या प्रकरणी चौकशी केली असल्याची माहिती दिली आहे.