Woman kisses Rahul Gandhi on stage: गुजरात (Gujarat) राज्यातील वलसाड (Valsad) येथे व्हॅलेंटाईन डेला आयोजित केलेल्या काँग्रेस रॅलीदरम्यान घडलेला प्रकार सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरला आहे. रॅलीला संबोधित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) व्यासपीठावर आले. या वेळी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे फुलांचे हार घालून स्वागत केले. दरम्यान, यातील एका महिलेने राहुल गांधी यांचे चुंबन घेतले. अचानक घडेला प्रकार पाहून काही काळ उपस्थितही गोंधळून गेले. मात्र, या घटनेमुळे राहुल गांधी जराही विचलीत होताना दिसले नाही. उलट त्यांनी शांतपणे या महिलेने दिलेल्या पुष्पहाराचा स्वीकार केला आणि मंद स्मीत केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत असे दिसते की, मंचावर आलेल्या महिलांमधील एक महिला राहुल यांना कानात काहीतरी सांगू पाहते. राहुल गांधी खाली वाकताच या महिलेने अचानक त्यांचे चुंबन घेतले. दरम्यान, भारतातील खास करुन ग्रामीण भारतातील अनेक लोक आपल्या आवडत्या व्यक्तीचे प्रेमाणे चुंबन घेतात. कदाचित, या महिलेनेही असे केले असावे अशी चर्चा या घटनेनंतर उपस्थितांमध्ये रंगली होती.
#WATCH A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, #Gujarat pic.twitter.com/RqIviTAvZ9
— ANI (@ANI) February 14, 2019
दरम्यान, या पूर्वीही अनेक राजकीय नेत्यांबाबत असे प्रकार जाहीर कार्यक्रमात घडले आहेत.