Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Kanpur Shocker: उत्तर प्रदेशमध्ये महिलेने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. आबिद अली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अटकेपासून वाचण्यासाठी या प्रकरणाला महिलने वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. उत्तेजक गोळ्या (Sex Enhancement Pills) खाल्ल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा महिलेने कट रचला होता. पण शेवटी तिचे कृत्य उघडकीस आले. त्यानंतर, आज गुरुवारी पोलिसांनी शबाना आणि तिचा प्रियकर रेहान यांना हत्येप्रकरणी अटक केली. या घटनेत रेहानचा मित्रही सामील होता. विकास असे त्याचे नाव आहे. त्याच्या शोधात पोलिसांची तीन पथके छापे टाकत आहेत.

 

शनिवारी आबिदचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. शबानाने तिच्या कुटुंबियांना सांगितले की, त्याचा मृत्यू सेक्स एनहायझरच्या अतिसेवनामुळे झाला आहे. आबिदच्या मानेवरील जखम पाहून शबानाचा भाऊ सलीम याला संशय आला. सलीमने बिठूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. (Thane Shocker: आपल्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी आईने प्रियकराला केली मदत; ठाण्यातील धक्कादायक घटना, तपास सुरू)

आबिदच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याची गळा दाबून हत्या झाल्याचे समोर आले. तयानंतर पोलिसांनी सर्वंचा जबाब नोंदवायला सुरूवात केली. दरम्यान, पत्नी पोलिसांना वेगवेगळी कारणे देऊन दिशाभूल करत राहिली. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देऊन पोलिसांनी तिची काटेकोरपणे तपासणी केली. तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी शबाना आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

शबानाचा खुलासा 

शबानाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तिने शनिवारी रात्री घराचा दारवाजा उघडा ठेवला होता. रेहान आणि विकास त्यांच्या घरात शिरले तेव्हा आबिद झोपला होता. त्या रात्री आबिद आणि शबानाचा मुलगा सलमान घरी नव्हता. तो त्याच्या मामाच्या घरी गेला होता. शबाना आणि रेहानने आबिदचा गळा दाबून खून केला. जेव्हा तो धडपडू लागला तेव्हा विकासने त्याचे हात आणि पाय धरले. तिघांनी मिळून त्याला मारले.

शबानाने सांगितले की आबिद आधीच काही औषधे घेत होता. पोलिसांना अपघात वाटावा म्हणून त्याने त्याच्याकडून लैंगिक उत्तेजन देणारी औषधे मागवली. आबिदची हत्या केल्यानंतर त्याच्या खिशात सेक्स वाढवणाऱ्या औषधांच्या 10 गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या.

शबानाने पुढे सांगितले की, रेहान आणि शबानाची एक वर्षापूर्वी फेसबुकवरून मैत्री झाली होती. हळूहळू संभाषण झाले. त्यानंतर त्यांच्या भेटी झाल्या. तिचा नवरादेखील तिला खूप मारहाण करायचा. तिला त्याच्यापासून सुटका करून घ्यायची होती. जेव्हा शबानाने आबिदला मारण्याबद्दल बोलले तेव्हा त्याने एका मिनिटातच होकार दिला. त्यानंतर शनिवारी शबाना आणि विकाससह आबिदची हत्या त्यांनी केली.