
दस्तुरखूद्द दिल्ली उच्च न्यायालयानेच म्हटले आहे की, एखाद्या पत्नीने जर तिच्या नवऱ्याला चारचौघात कानाखाली (चापटी) (Slapping) हाणली तर, ही बाब पतीला आत्महत्या करण्याच्या किंवा त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या कक्षेत येणार नाही. एका महिलेला आरोपमुक्त करताना न्यायालयाने हे स्पष्ट केले. चारचौघात कानाखाली मारुन पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा या महिलेवर आरोप होता. अगदी घरगुती स्वरुपाचे असलेले हे भांडण न्यायायालयात गेले. पुढे हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) जाऊन पोहोचले. अखेर न्यायालयाने सुनावणी नवरा-बायकोच्या या भांडणात निर्णय दिला.
या प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती संजीव सचदेवा (Justice Sanjeev Sachdeva ) यांनी सांगितले की, 'जर कोणी चारचौघात चापट (कानाखाली) मारल्याच्या कथीत घटनेला आत्महत्येला प्रवृत्त करणे मानत असेल तर, त्या व्यक्तिचेही आचरण असे पाहिजे की, कोणीही सामान्य विवेकवाला व्यक्ती अशा स्थितीत आत्महत्या करण्याचा विचार करेन. चारचौघात पतीला कानाखाली मारणे हे सामान्य स्थितीत पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे कारण ठरु शकत नाही. (हेही वाचा, बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील दाम्पत्याचे 25 फेब्रुवारी 2015 रोजी लग्न झाले होते. अल्पावधीतच त्यांनी एका मुलीला जन्म दिला. काही वादानंतर पत्नी पतीचे घर सोडून माहेरी गेली. 2 ऑगस्ट 2015 रोजी पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना तपासावेळी पतीच्या बेडवर एक सुसाईड नोट मिळाली. त्यानुसार पत्नीने पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला. दरम्यान, न्यायालयाचा निर्णय पत्नीच्या बाजूने लागला आहे. तसेच, न्यायालयाने तिला आरोपमुक्तही केले आहे.