Union Minister Nitin Gadkari (PC - ANI)

पूर्व लडाखच्या गलवाण (Galwan) खोऱ्यामध्ये सोमवारी (15 जून) झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतरही चीनकडून कुरापती सुरुच असल्यामुळे भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला करून दिली आहे. आमच्यासाठी देशाचे ऐक्य आणि सार्वभौमत्व सर्वात महत्वाचे आहे. भारताला शांतता हवी आहे. मात्र, जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे, असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे. या चीनच्या या दुष्कर्मामुळे आता संपूर्ण जगाला चीनशी व्यवहार करण्यात फारसा रस नसल्याचे चित्र समोर येत आहे. ही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जमेची बाजू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे.

चीनचे भारतासह अन्य देशांसोबतचे संबंध आता चिघळले असल्यामुळे चीनशी व्यवहार करण्यात आता जगाला फारसा रस उरला नाही. त्यामुळे अनेक देश भारताशी व्यवहार करण्यास पुढे येत आहेत. अशा स्थितीत भारताने आयातीपेक्षी निर्यातीवर जास्त भर देणे आवश्यक आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. India China Face-Off: भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम- पंतप्रधान नरेंद्र मोदी

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या 19 जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली.