योग्य माहिती देणा-या दक्ष नागरिकास पोलीस करुन देणार मोबाईल रिचार्ज; पाहा कोणत्या शहरात राबविण्यात येणार ही योजना
स्मार्टफोन (Photo Credits: Pixabay)

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार काय काय नवीन उपाययोजना याचा काही नेम नाही. यात 100 नंबर वर कॉल करुन चुकीची माहिती देणे हा ही एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यामुळे आता या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आग्रा पोलिसांनी (Agra Police) एक वेगळीच शक्कल लढविली आहे. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या माहितीनुसार, या शहरात आता पोलिसांनी दक्ष नागरिक म्हणून योग्य माहिती देणा-यास पोलीस स्वत: त्या व्यक्तीचा मोबाईल रिचार्ज करुन देणार आहेत.

सतर्क नागरिक पोलिसांसाठी फायद्याचे असतात, कारण त्यांच्यामुळे आरोपींना पकडण्यात मदत होते. त्याचबरोबर पोलिसांच्या मदतीला खबरीही असतात. खबरींचा वापरकरून पोलीस एखाद्या आरोपीचा मागोवा घेतात. त्यासाठी पोलीस खबरींशी कायम संपर्कात असतात. पण आता तुम्ही नागरिकही पोलिसांना मदत करू शकता, त्याबदल्यात पोलीस तुम्हाला मदत करतील. इतकच नव्हे तर पोलिसांना योग्य माहिती देणा-या नागरिकास पोलीस स्वत: मोबाईल रिचार्ज करुन देणार आहेत.

हेदेखील वाचा- शाळेत जाण्यासाठी बाईक दिली नाही म्हणून पोलीस कर्मचारीच्या मुलाने शाळेतच स्वत:ला घेतले पेटवून

त्याचबरोबर 100 नंबर फसवे फोन करणा-या भुरट्यांना आळा घालण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल असे आग्रा पोलिसांनी म्हटले आहे.

आग्राचे पोलीस अधिक्षक बबलू कुमार यांनी ही नवी युक्ती आणली आहे. त्यामुळे पोलिसांना योग्य सुचना आणि माहिती देणाऱ्या व्यक्तिचा फोन पोलीस रिचार्ज करून देतील. यासाठी आग्रा पोलिसांच्या वतीनं एक नंबरही जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर 9454458046 फोन किंवा मेसेज केल्यानंतर पोलीसांना योग्य माहिती मिळाल्यास लगेचच तुमचा फोनही रिचार्ज होईल.

बबलू कुमार यांच्या या कल्पनेला 4S असे नाव दिले आहे. यात समस्या, तक्रार, सुचना आणि तोडगा अशा चारचा समावेश आहे. पोलिसांना एखाद्या व्यक्तिकडून ही चार माहिती मिळाल्यास पोलीस त्याला लगेचच रिचार्ज करतील यासोबतच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पोलिसांकडून प्रशस्तीपत्रही देण्यात येईल.