शाळेत जाण्यासाठी बाईक दिली नाही म्हणून पोलीस कर्मचारीच्या मुलाने शाळेतच स्वत:ला घेतले पेटवून
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

वडिलांनी शाळेत जाण्यासाठी बाईक दिली नाही म्हणून एका पोलीस कर्मचारीच्या मुलाने स्वताला शाळेतच पेटवून घेतले. ही घटना नवीमुंबई (New Mumbai) येथील कळंबोली (Kalamboli) येथे घडली. वडिलांसोबत बाचाबाची केल्यानंतर तरुण शाळेत निघून गेला. शाळेत गेल्यानंतर तो वर्गात न जाता शाळेच्या शौचालयात गेला आणि स्वताला पेटवून घेतले. त्यानंतर आगीत होरपळत तरुण बाहेर आला त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी आग विझवून त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले. सध्या संबधित तरुणाची प्रकृती गंभीर आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शिवम दिपक जाधव असे या तरुणाचे नाव आहे. शिवमचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. शिवम हा रागीट स्वभावाचा होता. शिवमने शाळेत जाण्यासाठी त्याच्या वडिलांकडे बाईक मागितली होती. परंतु, वडिलांनी नकार दिल्यामुळे शिवम अधिकच चिडला. दरम्यान, वडिलांसोबत बाचाबाची करुन शिवम शाळेत निघून गेला. शाळेत पोहचल्यानंतर शिवमने वर्गात न जाता शाळेतील शौचालयात जाऊन स्वताला पेटवून घेतले. आगीमध्ये होरपळत शिवम आला त्यानंतर शिक्षकांनी आग विझवून त्याला एरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: बेपत्ता मुलीच्या वडीलांची आत्महत्या; चेंबूर परिसरात जमावाकडून दगडफेक

शिवम हा मोठ्या प्रमाणात भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. महत्वाचे म्हणजे, पालकांनी त्यांच्या पाल्यांना कोणत्या गोष्टीत विरोध करायचा का नाही, असा प्रश्न पालकवर्गाच्या समोर येऊन उभा राहिला आहे. पालकांनी विरोध केल्यामुळे पाल्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.