मुंबई: बेपत्ता मुलीच्या वडीलांची आत्महत्या; चेंबूर परिसरात जमावाकडून दगडफेक

अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या मुलीचा पोलिसांनी तपास न केल्यामुळे वडिलांनीच आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज दुपारी संबधित व्यक्तीची चेंबूर येथून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांच्या कामगिरीवर बोट दर्शवत, अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन- पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करायला सुरुवात केली. एवढेच नव्हेतर यावेळी जमावाने काही गाड्यांवर आणि दुकानांवरही दगडफेक केली. यावेळी दोन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमावाने संताप व्यक्त करत पोलिसांवरच दगडफेक करायला सुरुवात केली. यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

चेंबूर येथे ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणारी मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता असून पोलिस या प्रकरणात लक्ष नाहीत. या नैराश्यातून बेपत्ता मुलीच्या वडीलांनी आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. आज दुपारी चेंबूर परिसरातून बेपत्ता मुलीच्या वडिलांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी अंत्ययात्रेत सामील झालेल्या तरुणांनी संताप्त व्यक्त करत दगडफेक करायला सुरुवात केली. तसेच स्थानिक पोलीसांनी सहकार्य केले असते तर, आज ही घटना घडलीच नसते. याला पोलीसच जबाबदार आहे, असे बोलत अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुण त्यावेळी बोलत होते. दगडफेक करणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी आलेल्या २ पोलीसांवरही हल्ला करण्यात आला आहे. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत संबधित पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: PMC बॅंक खातेदारांचे आझाद मैदानावर आंदोलन

महाराष्ट्र टाईम्सचे ट्वीट-

पोलिसांना ही घटना टाळता आली असते. परंतु, पोलिसांनी कोणताही प्रयत्न केलाच नाही असा आरोप स्थानिक करत होते. पोलिसांनी आता तरी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घ्यावा अशी मागणी स्थानिक करत आहे. जमावातील ज्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला आहे, अशा तरुणांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.