
When will COVID End: कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या दोन लाटांमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा परिणाम उद्योधद्यांपासून ते रोजगारावर झाला आहे. त्यामुळे आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, कोरोना कधी संपणार? ऐवढेच नव्हे तर कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका असणार का? अशा विविध प्रश्नांनी नागरिकांना भांडावून सोडले आहे.
या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिकांनी देत असे म्हटले की, कोरोना लवकरच संपणारा नाही आहे. जवळजवळ पुढचे सहा-आठ महिन्यांपर्यंत तो राहणार आहे. महारोग संपुष्टात येण्यापूर्वी जगातील प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी एक तरी व्हायरसमुळे संक्रमित होईल. तसेच काहींना या स्थितीतून अधिक वेळा जावे लागू शकते. या व्यतिरिक्त कोरोनाची लस लावून घेतली जाणार नाही तोवर आणि त्याचा नवा वेरियंट येणार नाही तोपर्यंत तो राहू शकतो.
वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, काही लोक असे आहेत ज्यांना कोरोना दोन वेळा होऊ शकतो. त्यांनी असा अनुमान लावला आहे की, कोरोना सर्वांना सर्वांना आपल्या सर्वांना स्पर्श करणार नाही तोपर्यंत तो संपुष्टात येऊ शकत नाही.(COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 27,176 नवे कोरोना रूग्ण समोर; 284 मृत्यू)
मिनियापोलिस मध्ये मिनिसोटा युनिव्हर्सिटी मध्ये संक्रमण रोग अुसंधान आणि नीति केंद्राचे निर्देशक माइकल ओस्टरहोम यांनी चेतावणी दिली की, हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. त्यांनी पुढे असे म्हटले की, मी जगभरात होणाऱ्या या वृद्धिकडे पाहत असून पुढील आणखी काही वर्षापर्यंत व्यक्तीला याच्या विरोधात लढावे लागू शकते.