
नव्या कृषि कायद्यांविरोधात (Farm Bills) गेल्या अनेक दिवसांपासून नवी दिल्लीत अनेक शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. यात ब-याच शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला आहे. अशातच केंद्र सरकारने यावर योग्य ती भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने येत्या 8 डिसेंबरला म्हणजेच उद्या शेतकरी संघटनांनी भारत बंद (Bharat Band) ची हाक दिली आहे. यात 2 दिवसांपूर्वी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पाचवी बैठक झाली. मात्र त्यातही काही तोडगा निघाला नाही. दरम्यान या भारत बंद ला देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. उद्या या भारत बंद मध्ये देशात काय सुरु राहणार काय बंद राहणार याची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
उद्याच्या भारत बंद ला देशात आवश्यक सेवा कोणत्या मिळणार, दूध, भाज्या यांबाबत काय या सर्वांविषयी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. 8 डिसेंबरला सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भारत बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडण्याआधी काय सुरु राहील आणि काय बंद याविषयी जाणून घ्या.हेदेखील वाचा- Farmers Protest: शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात येत्या 9 डिसेंबरला शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट
8 तारीख को सुबह से शाम तक भारत बंद रहेगा। चक्का जाम शाम तीन बजे तक रहेगा। दूध-फल-सब्ज़ी पर रोक रहेगी। शादियों और इमरजेंसी सर्विसेज़ पर किसी तरह की रोक नहीं होगी: सिंघु बॉर्डर पर जय किसान आंदोलन से योगेंद्र यादव pic.twitter.com/gvc14gxSLR
— ANI_HindiNews (@AHindinews) December 6, 2020
1. 8 डिसेंबरला सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रहदारी ठप्प राहील. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. यात रुग्णवाहिका, औषधे इत्यादी सेवांना थांबवले जाणार नाही.
2. या दरम्यान लग्न सोहळे वा लग्नासाठीच्या गाड्या थांबवल्या जाणार नाही.
3. भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात या सेवा तुम्हाला मिळणार नाही. अशा वेळी उद्यासाठी लागणारा दूध, फळे, भाज्या यांचा आज थोडा जास्त पुरवठा करून ठेवा.
ऑफिससाठी वा अन्य कामांसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती माहिती घ्या. नाहीतर भारत बंद मुळे रहदारी ठप्प असल्याने तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल. गेले 11 दिवस नवी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असून या आंदोलनाने आता रुद्र रुप धारण केले आहे.