PUBG Ban झाल्याच्या दुःखात 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या,पश्चिम बंंगाल मधील धक्कादायक घटना
Image For Representation (Photo Credit: Pixabay)

पश्चिम बंगालच्या (West Bengal) नादिया जिल्ह्यात 21 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने पबजी (PUBG)  खेळू न शकल्यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. चकटाहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पूर लालपूर येथे आयटीआयचा विद्यार्थी प्रीतम हलदर हा त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. प्रीतमची आई रत्ना हलदार यांंच्या माहितीनुसार प्रीतम पबजी खेळ बॅन झाल्याने प्रचंड नाराज होता, घटनेच्या दिवशी तो सकाळी उठुन नाष्टा करुन पुन्हा आपल्या रुम मध्ये निघुन गेला दुपारपर्यंत त्याचा आवाज पण येईना म्हणुन शेवटी रत्ना त्याला जेवणासाठी बोलवायला म्हणुन दार ठोठवायला गेल्या. यावेळेस त्याने खोलीला आतुन कडी लावली होती. बराच वेळ त्याने दार न उघडल्याने रत्ना यांंनी घाबरुन शेजार्‍यांंना बोलावले ज्यांंनी दार तोडल्यावर आत प्रीतम पंख्याला लटकुन मृतावस्थेत दिसुन आला.

दरम्यान प्रीतम ने पबजीमुळे आत्महत्या केली असावी अशी शक्यता प्रीतमच्या आईने पोलिसांंकडे व्यक्त केली आहे, पोलिसांंना याप्रकरनी अनैसर्गिक मृत्युची नोंंद केली आहे. प्रीतमचे वडील विश्वजित हलदर हे सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. त्यांना एक मुलगीही आहे. PUBG Ban Effect: पबजी बॅन झाल्याने निरागस मुलाने असा व्यक्त केला राग; पहा Funny Video

PTI ट्विट

दरम्यान यापुर्वी सुद्धा तरुणांंनी पबजी च्या नादाने हरल्यावर, पालकांंनी खेळु न दिल्यावर अशा कारणांंनी आत्महत्या केल्याचे रेकॉर्ड आहेत. चीन विरुद्ध सुरु असणार्‍या तणावामुळे भारताने आता पबजी पुर्णतः बंंद केल्यावर अनेक पबजी प्रेमींंच्या भावनांंचा चुराडा झाला होता, सोशल मीडियावर ही आपण अशी उदाहरणे पाहिलीच असतील मात्र थेट आत्महत्या केल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.