Vaitarna Dam

मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरलं आहे. तसेच अन्य 4 धरणं 95 टक्क्यांहून जास्त भरली आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देखील मुंबईकरांची पाणीकपातीचा चिंता मिटली आहे. जुनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर जुलैमहिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. धो धो बरसलेल्या पावसाने मुंबईतील धरणांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली होती. पंरतू ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा दडी मारल्यानंतर शहरावर पुन्हा एकदा पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. अशातच पु्न्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने मुंबईतील सर्व धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरु आहे. असं असलं तरी मुंबईत शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 83.17 टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  अप्पर वैतरणा धरण 71.92 टक्क्यांनी भरलं आहे. मोडकसागर 94.20 टक्के, तानसा 98.12 टक्के, मध्य वैतरणा 96.26 टक्के, भातसा 78.47 टक्के, विहार 100 टक्के, तुळशी 98.12 टक्क्यांनी भरलं आहे.