Vodafone Idea चे प्रिपेड युजर्स साठी टॅरिफ रेट्स  20–25% ने वाढणार; 25 नोव्हेंबर पासून लागू होणार दर
VIL | PC: File Image

Bharti Airtel नंतर आता टेलिकॉम कंपनी Vodafone Idea कडून देखील त्यांच्या प्रिपेड युजर्सच्या टॅरिफ प्लॅन (Tariff Plan) मध्ये दरवाढ होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. ही दरवाढ 20-25% असणार आहे. असे कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे. दरम्यान ही वाढ 25 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. नवीन प्लॅन मध्ये ARPU (Average Revenue Per User)सुधारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर यामुळे उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक ताणाला तोंड देण्यास मदत करतील असे कंपनीने नोटीसीमध्ये म्हटलं आहे.

आताचा 79 रूपयांचा प्लॅन 99 रूपये होईल, ही 25% वाढ आहे. 149 चा प्लॅन 179 होईल. 1498 चा प्लॅन 1799 होईल. तर 2399 चा प्लॅन हा 2899 होईल. वोडाफोनच्या माहितीनुसार, डाटा टॉप अप मध्ये 48 चा प्लॅन आता 58 रूपये, 98 चा प्लॅन 118 रूपये, 251 चा प्लॅन 298 रूपये तर 351 चा प्लॅन आता 418 रूपये होणार आहे. (नक्की वाचा: E-Band 5G Service: ई-बँड 5जी सेवेसाठी Nokia , वोडाफोन आयडीयाची भागिदारी).

कालच भारती एअरटेल कडून टेरिफ प्लॅनमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे आणि आता त्यांच्यापाठोपाठ वोडाफोन आयडियाने किंमती वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. ही वाढ कमाल 25% आहे. एअरटेलचे नवे प्रिपेड दर 26 नोव्हेंबर पासून लागू केले जाणार आहेत.

व्होडाफोन आयडीया च्या दरवाढीचा परिणाम आज मुंबई शेअर बाजरात देखील दिसून आला. आज VIL, BSE index वर 0.28 ने घसरून ₹ 10.63 वर ट्रेड करत होता.