Narendra Modi | (Photo credit: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 'पीएम विश्वकर्मा योजना' लागू करण्यात आली. उल्लेखनिय म्हणजे विश्वकर्मा जयंती (Vishwakarma Jayanti) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस (PM Narendra Modi 73rd birthday) या दोन्हीचे औचित्य साधत या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेची घोषणा पंतप्रधानांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनी (77th Independence Day लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना केली होती. द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये 'पीएम विश्वकर्मा' योजनेच्या शुभारंभाच्या वेळी मोदींनी 18 पोस्ट तिकिटे आणि टूलकिट बुकलेट लाँच केले.

'पीएम विश्वकर्मा' योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये

    • PM विश्वकर्मा यांच्या योजनेसाठी केंद्र सरकार द्वारा 13,000 कोटी रुपयांच्या खर्चासह पूर्णपणे निधी देणार.
    • सामान्य सेवा केंद्रांद्वारे बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून संभाव्य लाभार्थ्यांनान नोंदणी करता येणार.

    • योजनेची नोंदणी विनामुल्य करता येईल. सदर योजना संपूर्ण भारतात शहर आणि ग्रामिण भागासाठी असेल. ज्यामुध्ये 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायाचा समावेश आहे. खास करुन लोहार, सुतार, सोनार, कुंभार, पाथरवट, गवंडी, बुरुड, मातंग (झाडून बनवणारे), विणकर, पारंपरीक खेळणी व्यवसायिक, न्हावी, शिंपी, धोबी, मच्छिमार यांसह अनेक व्यवसायिकांचा समावेश आहे.
    • पंतप्रधानांनी सांगितले की, योजनेसाठी पहिल्या वर्षी जवळपास 5 लाख कुटुंबांचा समावेश केला जाईल. पुढे FY24 ते FY28 या आर्थिक वर्षात पाच वर्षांमध्ये एकूण 30 लाख कुटुंबांचा समावेश केला जाईल.

    • कारागिर आणि उद्योजकांची गुणवत्ता सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
    • योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल आणि
    • मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाचा समावेश असलेले कौशल्य अपग्रेड केले जाईल.

  • पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना ₹15,000 चे टूलकिट प्रोत्साहन, ₹1 लाख (पहिला हफ्ता)
  • आणि ₹2 लाख (दुसरा टप्पा) पर्यंत 5% सवलतीच्या व्याज दराने संपार्श्विक मुक्त क्रेडिट सपोर्ट,
  • प्रोत्साहन दिले जाईल. हे व्यवराह डीजिटल स्वरुपात असतील असेही पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, आज पंतप्रधानांचा वाढदिवस असल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे सहकारी आणि अमित शहा आणि एस जयशंकर यांसारख्या मंत्रिमंडळ सदस्यांसह अनेक नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.