पासपोर्ट (Image Credits: PTI)

Hanley Passport Index च्या यादी भारताचा क्रमांक 87 व्या स्थानी आहे. ही क्रमवारी ग्लोबल पासापोर्ट रॅंकिंग चार्ट नुसार आहे. व्हिसा न घेता तुम्हांला जितक्या देशांमध्ये फिरण्याची परवानगी असते त्याच्यावर आधारित हे पासपोर्ट चं रॅकिंग असते. पासपोर्ट इंडेक्स हा तुमच्या राष्ट्राचे इतरांसोबत असलेले डिप्लोमॅटिक संबंधांचे निर्देशक असतात. भारतीय पासपोर्ट यामध्ये 87 व्या स्थानी आहे. यामध्ये 60 देशांत तुम्ही व्हिसा न घेता जाऊ शकता.

जपान हा यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. जपानचा पासपोर्ट असणारी व्यक्ती 193 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकते. त्यापाठोपाठ सिंगापूर, साऊथ कोरियाचा नंबर येतो. त्यांना 192 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे.

भारताने कोरोना संकटकाळात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घातली होती पण आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. व्हिसा फ्री आंतरराष्ट्रीय प्रवास म्हणजे तो स्वस्त तर असतोच पण त्यासोबत सुकर देखील असतो. नक्की वाचा: Pakistani Passport हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट, भारताचे पासपोर्ट कितव्या स्थानावर, जाणून घ्या.

भारतीयांना व्हिसा ऑन अरायवल देण्याची मुभा आशिया खंडात थायलंड, इंडोनेशिया, मालदिव, श्रीलंका मध्ये आहे. तर आफ्रिकेतील 21देशांमध्येही भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायवल आहे. तर युरोपातील केवळ दोनच देशांमध्ये आपल्याला व्हिसा ऑन अरायवल आहे.

1. Cook Islands

2. Fiji

3. Marshall Islands

4. Micronesia

5. Niue

6. Palau Islands

7. Samoa

8. Tuvalu

9. Vanuatu

10. Iran

11. Jordan

12. Oman

13. Qatar

14. Albania

15. Serbia

16. Barbados

17. British Virgin Islands 18. Dominica

19. Grenada

20. Haiti

21. Jamaica

22. Montserrat

23. St. Kitts and Nevis

24. St. Lucia

25. St. Vincent and the Grenadines

26. Trinidad and Tobago

27. Bhutan

28. Cambodia

29. Indonesia

30. Laos

31. Macao (SAR China)

32. Maldives

33. Myanmar

34. Nepal

35. Sri Lanka

36. Thailand

37. Timor-Leste

38. Bolivia

39. El Salvador

40. Botswana

41. Burundi

42. Cape Verde Islands

43. Comoro Islands

44. Ethiopia

45. Gabon

46. Guinea-Bissau

47. Madagascar

48. Mauritania

49. Mauritius

50. Mozambique

51. Rwanda

52. Senegal

53. Seychelles

54. Sierra Leone

55. Somalia

56. Tanzania

57. Togo

58. Tunisia

59. Uganda

60. Zimbabwe

दरम्यान अव्वल 10 देशांच्या यादीमध्ये जर्मनी, स्पेन, फिनलॅन्ड, इटली यांचा समावेश आहे. युके सहाव्या स्थानी आहे. त्यांना 187 देशांमध्ये फिरण्याची मुभा आहे. तर सातव्या स्थानी अमेरिका असून त्यांना 186 देशांमध्ये फिरण्यास व्हिसा लागत नाही.