वीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते म्हणणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तकावरून भाजप- शिवसेना मध्ये पुन्हा खडाजंगी; पहा काय म्हणाले संजय राऊत
Veer Savarkar, Shivsena, BJP (Photo Credits: File Image)

भोपाळ (Bhopal) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वाटप करण्यात आलेल्या 'वीर सावरकर-कितने 'वीर' या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्यात शाररीक संबंध असल्याचे म्हंटले गेले. या आक्षेपार्ह्य विधानावरून आता महाराष्ट्रात सुद्धा भाजप (BJP) आणि पूर्व मित्रपक्ष शिवसेने (Shivsena) मध्ये खडाजंगी सुरु झाली आहे. काही वेळापूर्वी या विधानावर प्रतिक्रिया देताना, भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता, महाराष्ट्र धर्माच्या पालनात जर सावरकर येत असतील?तर तातडीने सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला.मराठी बाणा दिसू द्या! असे शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आवाहन केले होते तर, याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी "सावरकर हे महान होते आणि काही विचारसरणीचे लोक त्यांच्याबाबत वाईट बोलत आहेत पण तो केवळ त्यांच्या विचारांचा प्रश्न आहे" असे उत्तर दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस तर्फे वाटण्यात आलेल्या पुस्तिकांमध्ये सावरकर यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटना, प्रश्न, वादांबाबत विविध वेगळ्या दृष्टिकोनातील माहिती दिली गेली आहे ब्रह्मचर्य ग्रहण करण्याआधी नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. सावरकर 12 वर्षांचे असताना त्यांनी एका मशिदीवर दगड भिरकावले असल्याचा दावाही या पुस्तिकेत करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाझीवादी आणि फॅसिस्ट संस्था म्हणून दर्शवण्यात आले आहे. हिटलर आणि मुसोलिनीच्या नाझीवादापासून संघाला प्रेरणा मिळाली असल्याचा दावा पुस्तिकेत करण्यात आला आहे.

आशिष शेलार ट्विट

धक्कादायक! राज्यात सत्ता स्थापनेसाठी नेते भांडत असताना, एका महिन्यात तब्बल 300 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; चार वर्षांतील सर्वाधिक संख्या

ANI ट्विट

दरम्यान, या विधानाचा राष्ट्रीय स्तरावर देखील विरोध केला जात आहे.मात्र यातील संपूर्ण माहिती ही लेखकाने पुराव्यांच्या आधारे लिहिली असल्याचा दावा काँग्रेसचे नेते लालजी देसाई यांनी केला आहे. आमच्यासाठी हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसून सध्या देशात प्रत्येक नागरिकाला आपली प्राथमिकता ठरवण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले.