Ro Ro Service Vasai- Bhayander: महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून वसई विरार व मीरा भाईंदर शहरात रो रो सेवेला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना कमी अंतर प्रवास करावा लागेल ज्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल. सद्या प्रायोगित तत्वावर सेवा सुरु करण्यात आली आहे. वसई भाईंदर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. हेही वाचा- मुंबई-मांडवा रो रो सेवा आजपासून पुन्हा सुरु; ऑनलाईन तिकीट बुकींगची सोय
मीडिया रिपोर्टनुसार, अद्याप या रो रो सेवाचे लोकार्पण झाले नाहीत. बोट सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी आणि बोटीतून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ - उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची तपासणी व्यवस्थितरित्या झाल्यानंतरच रो रो सेवेचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. आज या रो रो सेवेची सुरुवात झाल्यापासून परिसरातील अनेक प्रवाशांनी या बोटीतून प्रवास केला आहे.
सुवर्णदुर्ग शिपींग व मरिन सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणाऱ्या या जान्हवी या फेरी बोटीची क्षमता ३३ वाहने आणि १०० प्रवाशी इतकी असणार आहे. प्रवाशासाठी दहा ते पंधरा मिनीटाचा कालावघी असणार आहे. ही सेवा पुढील ३ महिने प्रायोगित तत्त्वावर सुरु होणार आहे. भरती आणि आहोटीच्या वेळीस फेरीबोटीच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती दिली आहे,