File image of an Air India flight (Photo Credits: ANI)

वंदे भारत मिशन (Vande Bharat Mission) माध्यमातुन आज दिल्ली (Delhi) वरुन मॉस्को (Moscow)  ला जाणार्‍या विमानाला माघारी बोलावुन घेण्यात आले आहे. या विमानाचा पायलट हा कोरोना पॉझिटिव्ह (COVID19) असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. एअर इंडिया (Air India)  चे ए -320 विमान नामक हे विमान मॉस्को मध्ये अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी दिल्ली वरुन सोडण्यात आले होते. यावेळी विमानात प्रवासी नव्हते. या विमानाच्या पायलट टीम मधील एकाची नुकतीच कोरोना चाचणी झाली होती, मात्र त्याचे अहवाल नजर चुकीने निगेटिव्ह असल्याचे ग्राउंडटीम ने सांगितले होते. आज विमानाचे उड्डाण झाल्यावर दुसरीकडे एअर इंंडियाच्या ग्राउंड टीमला ही चुक लक्षात आली.दुर्दैवाने या पायलटचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह होता. अशा वेळी अन्य टीमच्या सुरक्षेच्या कारणातुन या विमानाचे लॅन्डिंग करण्यात आले.

प्राप्त माहिती नुसार, जेव्हा ग्राउंडटीमला या पायलटचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले तेव्हा विमान उझबेकिस्तान येथे पोहचले होते. मात्र तिथुन विमान दिल्लीला परत बोलावण्यात आले.विमानाच्या क्रु मेंंबर्सना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमानाचे सुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. Coronavirus Update: भारतात कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, 7964 नव्या रुग्णांसह कोविड-19 बाधितांची एकूण संख्या 1,73,763 वर

ANI ट्विट

दरम्यान, जर का ही बाब वेळीच लक्षात आली नसती तर मोठा अपाय होण्याची शक्यता होती, अशी चुक करण्यासाठी एअर इंंडिया च्या या विमानाच्या ग्राऊंडटम च्या चौकशीचे डीजीसीएने आदेश दिले आहेत.