PUne Crime: PC TW

Pune Crime: पुणे (Pune) शहर हे गुन्हेगारीचे शहर म्हटलं जात आहे. दिवसेंदिवस वाढत चालले गुन्हेगारीचे प्रमाण पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहे. पुण्यातील वानवडी परिसरात तरुणांनी रात्रीच्या वेळीस वाहनांची तोडफोड करत दहशत पसरले आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'आम्ही या वसाहतीतील भाई' असं म्हणत तरुणांनी वाहनांची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा- अंतर्वस्त्रात लपवून आणलेले 32 किलो सोनं मुंबई विमानतळावर पकडलं; दोन परदेशी महिलांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवाडी परिसरातील पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार कपिल तांदळे यांची रिक्षाची तोडफोड केली. रात्री घरी परतत असताना परिसरातील तरुणांनी त्यांना अडवले. त्याच्या कडून जबरदस्तीने पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतेल. याचा प्रतिकार करत त्यांनी तरुणांवर दगडफेक केली. तेव्हा रागाच्या भरात त्यांनी रिक्षा फोडली.

कपिल यांनी रागाच्या भरात आरोपींना पोलिसांकडे जाऊन तक्रार करत असं सांगितले. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी कपिल यांचा पाठला केला. त्यांच्या परिसरातील आणखी काही वाहानांची तोडफोड केली. तरुणांच्या हातात वीटा, बॅट आणि आणखी काही हत्यारे दिसत आहे. ऐवढं नव्हे तर आरोपींनी परिसरात कल्ला केला. आम्ही या वसाहतीतील भाई आहोत, कोणीही आमच्या नादाला लागू नये, कोण मध्ये आलं तर आम्ही कोणाचीही विकेट पाडू, एकेकाला जीवे मारून टाकू अशी धमकी देत होते.या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे,