Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

Vaccination for Children: देशात येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण अभियानाला सुरुवात होणार आहे. प्रौढांप्रमाणेच आता मुलांना सुद्धा लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही 1 जानेवारी पासून सुरु केली जाणार आहे. मुलांचे रजिस्ट्रेशन हे CoWIN अॅपच्या माध्यमातून करावे लागणार आहे, नॅशनल अथॉरिटीचे सीईओ डॉ. आरएस शर्मा यांनी असे सांगितले की, 1 जानेवारी पासून 15-18 वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे.(COVID-19 Vaccine For Children: लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी 'अशी' असेल प्रक्रिया, जाणून घ्या कोणती देणार लस ?)

डॉ. शर्मा यांनी असे म्हटले की, लस घेण्यासाठी कोविनच्या माध्यमातून प्रथम रिजस्ट्रेशन करावे लागणार आहे. परंतु ज्या मुलांकडे आधार कार्ड नाही त्यांनी कोविन अॅपवर 10वी ची मार्कशीट लावण्याचा ही ऑप्शन दिला आहे. त्याचसोबत मुलांना विद्यार्थी आयडीवर ही रजिस्ट्रेशन करु शकतात. पालकांच्या फोनवरुन लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन मुलांना करता येणार आहे. कारण एकाच क्रमांकावर एका परिवारातील 4 लोकांचे रजिस्ट्रेशन करता येते. त्याचसोबत मुलांना आपल्या घराजवळील लसीकरण केंद्रावर जाऊन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन ही करता येईल.(Booster Dose in India: भारतामध्ये कोविड 19 लसीचा दुसरा डोस आणि Precaution Dose मध्ये 9-12 महिन्याच्या फरकाची शक्यता; Official Sources ची माहिती)

डीसीजीआयने काही नियमांसह 12 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या अल्पवयीन मुलांसाठी भारत बायोटेकची कोरोनावरील लस ही आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. ही लस जायडस कॅडिला द्वारे तयार करण्यात आली असून सुईशिवाय असणाऱ्या कोविड19 लस जायकोव-डी नंतर 18 वर्षाखालील लहान मुलांना वापरासाठी प्रशासनाच्या परवानगी नंतर दिली जाणारी दुसरी लस आहे.