यमुना एक्सप्रेस-वे येथे भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) आज मंगळवारी (19 फेब्रुवारी) यमुना एक्सप्रेस- वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पटनाच्या दिशेने रुग्णवाहिका जात होती. त्यावेळी रुग्णवाहिका यमुना एक्सप्रेस-वे येथील एक दुभाजकावर जोरात आदळली. त्यानंतर आग्रायेथून दिल्लीसाठी जाणाऱ्या कारने या रुग्णवाहिकेला धडक दिली. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहचून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. तर अन्य जखमींना अपघातानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.