स्मृती ईराणी यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता सुरेंद्र सिंह | (Photo Credit- ANI/PTI)

उत्तर प्रदेश (Utter Pradesh) राज्यातील अमेठी (Amethi) येथे भाजप (BJP) खासदार स्मृती इराणी (एसीगूग घीोलग) यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना 26 मे रोजी घडली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून आता पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वसीम असे आरोपीचे नाव असून तो सुरेंद्र यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी वसीम याला रात्री उशिरा अटक केली आहे. त्यावेळी वसीमकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. मात्र पोलिसांना वसीमने पाहताच गोळीबार करण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये एक पोलीस जखमी झाला आहे. त्याचसोबत पोलिसांकडूनही गोळीबार केल्याने वसीम सुद्धा जखमी झाला आहे.

(अमेठी: स्मृती ईराणी यांच्या सुरेंद्र सिंह नामक निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या)

यापूर्वी सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. तर आता पाचव्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.