केदारनाथ पाठोपाठ आज उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath Temple) दरवाजे खुले करण्यात आले आहेत. सध्या देशभरात असलेल्या कोरोना व्हायरसचं संकट पाहता यंदा बद्रीनाथ मंदिर मुख्य पुजार्यासह केवळ 28 जणांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आले आहे. आज पहाटे 4.30 च्या सुमारास हे मंदिर उघडण्यात आलं आहे. दरम्यान बद्रीनाथ मंदिराचे मुख्य पुजारी केरळहून परतल्यानंतर त्यांची त्यांना काही काळ क्वारंटीन करण्यात आले होते. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं पहायला मिळालं. मागील आठवड्यात जोशी मठात पोहचल्यानंतर मुख्य पुजारांचा इंस्टिट्युशनल क्वारंटीनचा काळ संपल्यानंतर दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. दरम्यान आज (15 मे) बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी संपूर्ण मंदिरावर फूलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
आज सकाळी गणेश पूजेनंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर भगवान नारायणावर तेलाचा अभिषेक, झाला. आज भगवान बद्रीनाथासोबतच आयुर्वेदाची देवता असलेल्या धन्वंतरीची देखील पूजा करण्यात आली. सध्या भारतासह जगावर घोंघावणार्या कोरोना संकटाला संपवण्याची प्रार्थना झाली.
ANI Tweet
Uttarakhand: The portals of Badrinath Temple opened at 4:30 am today. 28 people including the Chief Priest was present at the temple when its portals opened. pic.twitter.com/jVDGmoZ9Vs
— ANI (@ANI) May 15, 2020
29 एप्रिल दिवशी 6 महिन्यांच्या हिवाळी सुट्टीनंतर केदारनाथ मंदिराचेदेखील दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र भाविकांना यंदा कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान दरवरर्षी साधारण या महिन्यातच बद्रीनाथ, केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळा ओसरल्यानंतर उघडतात.