Uttarakhand: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी रिप्ड जीन्स (Ripped Jeans) वरुन केलेल्या विधानानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यावेळी त्यांनी सध्याच्या तरुणाईमध्ये रिप्ड जीन्सचा ट्रेन्ड असून ते कोणते संस्कार आहेत असे विधान केले होते. याच विधानावरुन त्यांना सोशल मीडियात घेरण्यात आले आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली गेली. याच प्रकरणी आता तीरथ सिंह रावत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन माफी मागितली आहे.
आजतक यांनी रिप्ड जीन्सवरुनच तीरथ सिंह रावत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देत असे म्हटले की, मी एका सामान्य ग्रामीण परिवारातून आलो आहे. जेव्हा आम्ही शाळेत जायचो. तसेच जेव्हा कधी आमची पॅन्ट फाटलेली असलायची त्यावेळी शिक्षा होईल आणि शिक्षकांच्या भीतीपोटी आम्ही त्याच्यावर टॅग लावत होते. त्यामुळे फाटलेला भाग त्या टॅग मुळे लपला जायचाय मात्र आता सध्याची मुल ही 2-4 हजारांच्या जीन्स घेताना पाहतात की ती फाटलेली आहे की नाही. जर फाटलेली नसेल तर घरी जाऊन त्यावर कैची चालवातात. तर मी काय चुकीचे म्हटले? असा सवाल सुद्धा तीरथ सिंह रावत यांनी त्यावेळी उपस्थितीत केला.(फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय? उर्मिला मातोंडकर हिची मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका)
रावत यांनी पुढे असे म्हटले की. संस्कार आणि शिक्षा, परिवारात असेल तर तो कधीच अयशस्वी होणार नाही. फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर मुलाच्या या अन्य गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे. यामध्ये काय चुकीचे म्हटले? तर मला मुलगी आहे तिला सुद्धा हा नियम लागू असेल. मी फक्त दुसऱ्यांबद्दलच बोलत नाही आहे पण मी स्वत: सुद्धा त्याचे पालन करतोय. ज्या कार्यक्रमात मी हे विधान केले तो सुद्धा अशाच विषयाचा होता.
जीन्स वरुन काय समस्या आहे असे तीरथ सिंह रावत यांना विचारले असता त्यांनी उत्तर देत म्हटले की, मला जीन्सची समस्या नाही पण फाटलेल्या जीन्स आवडत नाहीत. जीन्स मी स्वत: सुद्धा घातल होते मात्र आता एखाद्याला याच पद्धतीची जीन्स घालायची असेल तर मी काय करु शकतो? माझ्या विधानामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो असे तीरथ सिंह रावत यांनी स्पष्ट केले आहे.