सेक्स करताना पतीनेच बनवला व्हिडीओ, संतप्त पत्नीची पोलिसांकडे धाव
Image For Representation (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेश: पती पत्नीच्या नात्यातील प्रणयाचा क्षण हा खरतर खूप खाजगी विषय मानला जातो, पण उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilley)  येथे राहणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीसोबत सेक्स करत असताना चक्क मोबाईलवर व्हिडीओ काढला, एवढच नव्हे तर त्या व्हिडीओवरून या पतीने आपल्याच पत्नीला धमकावयाला सुरुवात केली, आपल्याला वाटेल तेव्हा आपल्यासोबत सेक्स करावा अशी या पत्नीची मागणी होती, आणि जर का पत्नीने त्याला नकार दिला तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर आपण व्हायरल करू अशी त्याने धमकी दिली होती, या प्रकाराने वैतागलेल्या पत्नीने अलीकडेच बारादरी पोलीस स्थानकात आपल्याच पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

या महिलेच्या तक्रारीनुसार, मागील वर्षी २९ ऑक्टोबर ला या महिलेचा विवाह झाला. त्यानंतर एकदा नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते. या प्रकाराला महिलेने त्याच वेळी विरोध केला होता मात्र तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन देऊन विषय बदलला. यानंतर काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले.यामुळे पतीला राग आला आणि त्याने पुन्हा जबरदस्ती करत व्हिडिओ बनवला. आणखी काही वेळा अशाच प्रकारे तिच्यावर लैंगिक जबरदस्ती करण्यात आली. Marital Rape हे घटस्फोटाचे कारण नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

जेव्हा तिने याबद्दल सासू-सासऱ्यांकडे मदत मागितली पण त्यांनी आपल्या मुलाची बाजू घेतली. नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. 30 जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व 7 जुलै ला बारादारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

दरम्यान पोलिसांनी, याप्रकरणी तपास करत पती विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे, मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.