नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यालयाने (Delhi High Court) मंगळवारी एका खटल्याच्या दरम्यान Marital Rape हे घटस्फोटाचे कारण म्ह्णून गृहीत धरले जाणार नाही असा निर्णय दिला आहे. न्यायाधीश डी. एन. पटेल (D.N Patel) आणि सी. हरिशंकर (C. Harishankar) यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या सुनावणीत कोर्टाने आपल्याला हा अधिकार नसल्याचे म्हंटले आहे. वैवाहिक बलात्काराच्या आरोपावरून घटस्फोटाच्या मागणीवर निर्णय देणे हे आपल्या कार्यकक्षेत येत नाही असेही कोर्टाचे म्हणणे आहे. धक्कादायक! Sex ला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतःचेच गुप्तांग कापले, पोलिसांकडे दिली कबुली
काही दिवसांपूर्वी ,वकील अनुजा कपूर यांनी याच संदर्भात कोर्टात एक याचिका दाखल केली होती. वैवाहिक बलात्कार हा आयपीसी 498A च्या अंतर्गत गंभीर आरोप असताना त्याला घटस्फोटचे कारण का म्हणता एणार नाही असा सवाल याचिकेत करण्यात आला होता. यावर कोर्टाने हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा मुस्लिम व्यक्तिविषयक कायदा किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये वैवाहिक बलात्कार हा घटस्फोटाचा पाया असल्याचे म्हंटलेले नाही असे सांगतात याचिका फेटाळून लावली होती, मात्र यानंतर अशा घटना झाल्यास यावर न्याय कसा दिला जाणार असा प्रश्न करत अनुजा यांनी कोर्टाला दखल घेण्याची विनंती केली आहे.