Uttar Pradesh: लज्जास्पद! लैंगिक अत्याचार करण्याचा विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला
प्रतिकात्मक फोटो (File Photo: IANS)

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यात 9 वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करत लैंगिक अत्याचार  करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी तिने त्याचा विरोध केला असता तिच्यावर ब्लेडने वार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामध्ये पीडिता गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी जरिया ठाण्याअंतर्गत गोहांड परिसरात घडली आहे.(Gurugram: केयरटेकरकडून 13 महिन्यांच्या मुलाचा छळ, शरीराचे हाड मोडले; रडल्याच्या कारणावरुन कृत्य)

अल्पवीयन मुलीचा बचाव केला त्यावेळी आरोपींनी धमकी सुद्धा दिली. तीन लोक मुलीकडे पाहत होते आणि त्यांनी तिच्यासोबत छेडछाड करण्यास सुरुवात केली. पीडिताच्या आई-वडिलांनी तक्रारीत असे म्हटले की, जेव्हा त्यांच्या मुलीने विरोध केला असता त्यावेळी तिच्यावर ब्लेडने हल्ला करण्यात आला. यामुळे ती गंभीर जखमी झाली.(Racism in Oxford: ऑक्सफोर्ड वर्णभेद प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया, 'गरज पडल्यास भारत इंग्लंडसोबत चर्चा करेन')

दरम्यान, पीडिता जेव्हा एका इंटर कॉलेजच्या परीक्षेसाठी जात होती. त्यावेळी ही घटना घडली असून गंभीर जखमी झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे ही पोलिसांनी म्हटले आहे.