
गुरुग्राम (Gurugram) येथील सेक्टर 56 एका दाम्पत्याने आपल्या घरात काम करणाऱ्या केअरटेकर विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. या केयरटेकरवर आपल्या 13 महिन्याच्या बाळाला मारहाण (Caretaker Brutally Thrashes Baby) केल्याचा आणि आपटल्याचा आरोप आहे. केअरटेकरचे वय 15 वर्षे आहे. केयरटेकरणे मारहाण केल्यानंतर बाळाच्या शरीरातील 4 हाडं मोडली आहेत. तसेच, बाळाच्या लीवर, किडणी आणि जटरालाही मोठी दुखापत झाल्याचे पुढे आले. सद्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मुलाची प्रकृती नाजूक असल्याचे समजते.
तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे की, बाळाची देखभाल करणाऱ्या केयरटेकर विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाईक करण्याची मागणी केली आहे. पंजाब राज्यातील पटियाला येथील मूळ निवासी असलेल्या निखील भाटिया यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. भाटिया हे गुरुग्राम येथील सेक्टर-56 मध्ये राहतात. (हेही वाचा, सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव)
प्राप्त माहितीनुसार, निखील भाटिया यांनी यांनी सबिना नामक महिलेला स्वयंपाक बनविण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर भाटीया दाम्पत्याला एक मुलगी झाली. त्यानंतर या मुलीची देखभाल करणयासाठी सबिनाच्या माध्यमातून फिरोजा खातून नावाच्या एका महिलेला नियुक्त करण्यात आली.
निखील भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार पाठिकामागच्या सोमवारी त आपली पत्नी जसमीत भाटिया हिच्यासोबत घरगुती साहित्य खरेदी करणयासठी बाहेर गेले होते. या वेळी त्यांची 13 महिन्यांची मुलगी जियाना भाटिया झोपली होती. जाताना त्यांनी फिरोजा खातून हिला बाळाची निट काळजी घेण्यास सांगितले.
दरम्यान, भाटिया दाम्पत्य परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की, 13 महिन्यांची मुलगी जियाना मोठमोठ्याने रडत असल्याचे पाहायला मिळाले. खूप वेळ होऊनही मुलगी रडायचे थांबेचना. मग त्यांनी आपल्या बाळाला घेऊन स्थानिक रुग्णालय गाठले. तेव्हा तपासणी करताना लक्षात आले की, मुलाच्या शरीरातील 4 हाडं तुटली आहेत.
प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालालयातही बाळाची तपासणी झाली तेव्हा लक्षात आले की, बाळाच्या शरीराची 4 हाडं तुटली आहेत. त्यासोबतच बाळाच्या यकृत, कीडणी आणि जठरालाही मोठी दुखापत झाली आहे. या सर्व घटनेनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी (भाटिया दम्पत्य) पोलिसात तक्रार दिली.