Uttar Pradesh Shocker: मोबाईलवर पाहिलेले स्टंट करुन व्हिडिओ बनविणे 11 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले आहे. सदर मुलाने मोबाईलवर एक स्टंट पाहिला होता. जो प्राण वाचविण्याबाबत होता. हा स्टंट करुन व्हिडिओ बनविण्याच्या नादात या मुलाला गळफास (Attempting Hangs Himself) लागला आणि त्याचा मृत्यू झाला. व्हिडिओ बनविण्याची कल्पनाही या मुलाला मोबाईल पाहूनच सूचली होती. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील हमीरपूर (Hamirpur) येथे घडली. पीडित मुलगा रवींद्रनाथ टागोर नगरमध्ये इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकतो. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये वाढत असलेले मोबाईल पाहण्याची सवय आणि त्यातून निर्माण होणारे धोके, पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
आईचा स्कार्फ वापरुन गळफआस
घटनेबाबत माहिती अशी की, स्थानिक शाळेत शिकणारा हा अल्पवयीन मुलगा गुरुवारी दुपारी शाळेतून घरी परतला. शाळेतून परतताच तो मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला. त्याने पाहिलेल्या व्हिडिओ सामग्रीपासून प्रेरित होऊन या मुलाने त्याच्या आईच्या स्कार्फमधून तात्पूरता गळफआस तयार केला. त्याचा वापर करून, रीलवर प्रात्यक्षिक केलेल्या जीवन-बचत तंत्राचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, त्याच्या गळ्यात फास घट्ट झाला आणि त्याचा मृत्यू झाला. बहुदा तो बराच वेळ लटकत्या आवस्थेत होता. आई जेव्हा त्याच्या खोलीत पोहोचली तेव्हा समोरील दृश्य पाहून तिला धक्का बसला. आई घरात पोहोचल्यामुळे घटनेचा उलघडा झाला. मुलाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर तरुण पाल यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा, YouTube Video पाहून नक्कल करताना 12 वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू)
पोलिसांचा हस्तक्षेप आणि कौटुंबाचे समुपदेशन:
धक्कादायक बाब अशी की, इतकी मोठी घटनाघडूनही कुटुंबीयांनी पोलिसांना कोणतीही कल्पना दिली नाही. मात्र, सदर घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसंना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर मुलाचा मृतदेहही ताब्यात घेतला. मात्र, कुटुंबीय त्याचे शवविच्छेदन करु देण्यास नकार देत होते. शेवटी पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, पीडित कुटुंबातील मृत मुलगा हा दोन भाऊ आणि बहिणीमध्ये सर्वात मोठा होता.
'देखा मुझे कुछ नहीं हुआ'
हमीरपूर एसपी दीक्षा शर्मा यांनी सांगितले की, मुलाच्या फोनवरील कृतीच्या तपासणीत YouTube वर त्याची उपस्थिती सक्रिय नोंदवली गेली. त्याने पाहिलेल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये एक रील दाखवण्यात आली होती ज्यामध्ये एका मुलाने रुमाल वापरून फास बनवला होता. तसेच फाशीच्या कृतीचे अनुकरण केले होते आणि 'देखा मुझे कुछ नहीं हुआ' (पहा, मला काहीही झाले नाही) असे शब्द उच्चारत, बिनधास्तपणे व्हिडिओ बनवला होता. हाच व्हिडिओ पाहून या मुलाने अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाला.