Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मोबाईल अथवा इंटरनेटवर वारंवार पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओचा, माहितीचा लहान मुलांवर मोठा परिणाम होताना पाहायला मिळतो आहे. इंटरनेट वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. नागपूर (Nagpur ) येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबतही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. आठवीत शिकणारा हा चिमूकला शेजाऱ्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चिमूकला युट्यूबवर (YouTube Video) पाहिलेल्या व्हिडिओची नक्कल करत होता. ही नक्कल करताना त्याला गळफास लागला आणि त्याचा मृत्यू झाला.

अग्रन्या बारापात्रे असे या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. अग्रन्या बारापात्रे लाठी चालवण्यात वाक्बर होता. त्याला प्रजासत्ताक दिनी चालवलेल्या लाठी स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या तर , इंदूरमध्ये दुहेरी-लाठी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेत गौरवले जाणार होते. दरम्यान, त्याच्या गूढ मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे अग्रन्या हा त्याच्या आईवडीलांना एकुलता एक मुलगा होता. (हेही वाचा, Honour killing: नांदेड हादरले! मुलीच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध; गळा आवळून केला खून, शेतात जाळला मृतदेह)

सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रन्याकडून आतमहत्या झाली असावी. त्या मृत्यू हा YouTube चॅलेंज व्हिडिओशी संबंधित असावा. प्राथमिक तपासानुसार मृत्यूदरम्यान तो युट्यूब व्हिडिओ पाहात होता. व्हिडिओत एक महिला तिचे हात पाठीमागे बांधल्यानंतर आणि तोंड दाबून स्कार्फने तोंड झाकून पळून जाण्यात यशस्वी कसे होते हे दाखवताना दिसत आहे.

पोलिसांनी सांगितले की, अग्रन्याचा मृतदेह गळ्यात स्कार्फ बांधलेला पण गाठ नसलेला, शेजारच्या गच्चीकडे जाणाऱ्या लाकडी शिडीला लटकलेला आढळून आला. अग्रन्या वारंवार वापरत असलेल्या सेलफोनवर मन्या क्रिएशन्सचे "फुल फेस कव्हर चॅलेंज" यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड केलेले आढळले. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून, मुलाने आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण अद्याप पुढे आले नाही.