Uttar Pradesh Shocker: एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मेहुणा आणि भाजा गंभीर जखमी
Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

एकतर्फी प्रेमातून आलेल्या नैराश्येतून (Kanpur) आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कानपूर (Kanpur) जिल्ह्यातील भिल्हारपूर येथे घडली. पीडितेचे नाव सन्नो असे असून ती केवळ 20 वर्षांची आहे. धक्कादायक असे की, घटना घडल्यानंतर आरोपीने स्वत:ही विशप्राषण करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बेशुद्धावस्थेत असतानाच पोलीस तेथे पोहोचल्याने त्याचे प्राण वाचविण्यात सध्यातरी यश आले आहे. दरम्यान, त्याला वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पीडिता मेहुण्याच्या दुचाकीवरुन आपल्या बहिणीच्या घरी निघाली होती. या वेळी आरोपीने त्यांना राणा गावानजिक अडवले आणि हल्ला केला. ही घटना घडली त्या वेळी सन्नो सोबत तिचा 10 वर्षांचा भाचाही होता. आरोपींनी त्यांना जीटी रोड हायवे परिसरात अडवले.

कुऱ्हाड आणि चाकूने सपासप वार

पोलीस उपायुक्त विजय धूळ यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात टाइम्स ऑफ इडियाने म्हटले आहे की, सना, तिचा मेहुणा आणि भाचा हे तिघेजण राणा गावाजवळील जीटी रोडवरुन निघाले होते. या वेळी आरोपी सुरेश कुमार याने त्यांची दुचाकी आडवली. त्याने दुचाकीला धडक दिल्याने तिघेही खाली पडले. पुढच्या काहीच क्षणात आरोपीने रान्नो हिच्यावर कुऱ्हाड आणि चाकूच्या सहाय्याने वार केले. ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. तिच्या डोक्याला, गळ्याला आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा: Girl Climbs Mobile Tower Video Viral: बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीचा मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' ड्रामा; व्हिडिओ व्हायरल)

पीडतेचा मृत्यू आरोपीची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, पोलिसांनी तातडीने दखल घेत प्राप्त तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच, पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता. तो रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याने विषप्राषण केल्याचे त्याच्या एकूण परीस्थितीवरुन लक्षात येत होते. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टारांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली. त्यावरुन त्याला लाल लजपतराय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परंतू, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

एक्स पोस्ट

एकतर्फी प्रेमातून कृत्य

अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडितेवल एकतर्फी प्रेम करत होता. त्यातूनच त्याने तिच्यावर हल्ला करुन तिची हत्या केली. दरम्यान, प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. फॉरेन्सीक आणि गुन्हे विभागाचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रकरणाचा चहुबाजूंनी तपास केला जातो आहे. घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली.