Uttar Pradesh: प्रेम कहाण्या आपण आजवर अनेक ऐकल्या असतील, पण एका व्यतीची रात्रभर मारहाण करून सकाळी त्याला जावई बनवून घेणे हे कदाचित पहिल्यांदाच ऐकले असतील. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) जिल्ह्यात एक आगळं-वेगळं प्रकरण समोर आलं आहे. रामपूर येथे रात्री उशिरापर्यंत एका व्यक्तीला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. रामपूरच्या अझीममनगर पोलिस ठाण्याच्या (Azimnagar Police Station) हद्दीतील मेहंदी नगर सुमाली गावात राहणारी लक्ष्मीशी प्रेमसंबंध असणाऱ्या नागली गावचा रहिवासी प्रेम सिंहची (Prem Singh) कहाणी आहे. प्रेम बऱ्याचदा रात्री उशीरा तिच्या घरी तिला भेटण्यासाठी जायचा आणि त्या दिवशीही असेच घडले. मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता जेव्हा गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी युवकाला पकडून जोरदार मारहाण केली, त्यानंतर सकाळी मुलीचे त्या मुळाशी लग्न लावून दिले. (Uttar Pradesh Suicide: धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह पोलीस इन्स्पेक्टरने रुग्णालयातच हाताची नस कापून केली आत्महत्या; उत्तर प्रदेशमधील घटना)
News24 मध्ये दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या संतप्त कुटुंबाने आरोपी युवकाला पकडून खोलीत बंदिस्त केले. यानंतर मुलीच्या घरी रात्रीच्या वेळी मुलाला जोरदार मारहाण केली आणि सकाळी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेयसीच्या कुटूंबातील सदस्यावर ओलीस ठेवून युवकाची मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आणि कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली. यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांच्या सल्ल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक सहमत झाले आणि मग त्यांनी लग्नास सहमती दर्शवली. दुसर्या दिवशी प्रेम आणि लक्ष्मीने अझीमनगर भागातील एका छोट्या मंदिरात लग्न लावून देण्यात आले. या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
गर्लफ्रेंड से मिलने पहुंचे प्रेमी को रात भर घरवालों ने पीटा, सुबह बना लिया दामाद
उत्तरप्रदेश के रामपुर का अजब-ग़जब मामला..#UttarPradesh pic.twitter.com/rd16wjwEPi
— News24 (@news24tvchannel) November 22, 2020
तक्रार दाखल होताच युवकाला आणि त्याच्या कुटूंबाला पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले. तेव्हाच मुलीच्या बाजूने समजुतदारपणा म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले. या आगळ्या-वेगळ्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा होत आहे आणि 'असाही एक विवाह' असं प्रत्येकजण म्हणत आहे.