Uttar Pradesh: गरम पाण्यावरुन झालेल्या वादावरुन तुटले 16 वर्षांचे नाते, नवऱ्याने बायकोला दिला तिहेरी तलाक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Uttar Pradesh:  उत्तर प्रदेशातील बाराबाकी येथे गरम पाण्यावरुन नवरा-बायकोमध्ये वाद झाले. या शुल्लक कारणावरुन नवऱ्याने चक्क बायकोला तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. असे सांगितले जात आहे की, या दोघांचा निकाह होऊन 16 वर्ष झाली होती. त्यांना पाच मुले सुद्धा आहेत. तिहेरी तलाकाच्या विरोधात कायदा तयार करण्यात आल्यानंतर ही अशी प्रकरणे थांबताना दिसून येत नाही आहेत. पीडितेची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली आहे.

जाहांगीर ठाणे परिसरातील सदरुद्दीन गावातील हे प्रकरण आहे. गरम पाण्यावरुन झालेल्या वादामुळे नवऱ्याने बायकोला तिहेरी तलाक दिला आहे. पीडितेने तिच्या भावासह पोलिसात धाव घेत नवऱ्याने तिहेरी तलाक देत नाते संपवण्याचा आरोप तिने लावला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.(UP: निकाहापूर्वी मागितले 10 लाख रुपये, बँक्वेट हॉलमध्येच नवरदेवाला धू-धू धुतले)

बायकोने असा आरोप लावला आहे की, निकाह झाल्यानंतर सासरची मंडळी तिचा छळ करायचे. तिला पाच मुले असून सर्वात लहान मुलगा दोन वर्षांचा आहे. पीडितेने म्हटले की, गुरुवारी औषध खाण्यासाठी नवऱ्याला गरम पाणी तिले असता तो भडकला आणि त्याने तिहेरी तलाक दिला. त्याचसोबत मुलांना सुद्धा मारहाण केली.

या प्रकरमी एसओ दर्शन यादव यांनी असे म्हटले की, नवऱ्यावर तिहेरी तलाक दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी तपास केला जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पीडितेचे असे म्हणणे आहे की, तिच्या लहान मुलांचे पालनपोषण करणारा कोणीही नाही आहे.