Uttar Pradesh Floods:  उत्तर प्रदेश राज्यात महापूर; प्रयागराज, वाराणसी, कानपूर, इटावासह 24 जिल्ह्यांना फटका, 605 गावे पूरग्रस्त
Uttar Pradesh Floods | (Photo Credit : ANI/Twitter)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यांतील 605 गावांना महापूराचा (Uttar Pradesh Floods) फटका बसल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने दक्षिण उत्तर प्रदेश विभागातीलहमीरपूर, बांदा आणि जालौन हे जिल्हे अधिक पूरग्रस्त असल्याचे समजते. मध्य प्रदेशातील इटावा जिल्ह्यात 67 गावे पूराचा सामना करत आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये 110 गावांचा संपर्क तुटला आहे. प्रयागराज, गाजीपूर आणि बालिया येथे गंगा नदी धोकादायक पातळी ओलांडून वाहात आहे. यमुना नदीनेही पाच ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाठीमागील 24 तासात प्रयागराजमध्ये 12 पट अधिक पाऊस पडला आहे. तर एकूण उत्तर प्रदेशमध्ये 154% अधिक पाऊस पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मठ्या प्रमाणावर धरणे आणि बंधाऱ्यांतून पाणी सोडल्याने अनेक नद्यांना महापाूर आला आहे. या महापूराने 600 पेक्षाही अधिक गावांना पाण्याचा विळखा पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कालच पूरग्रस्त जालौन आणि हमीरपूर परिसराचा हवाई दौरा केले आहे. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचावकार्याबाबत निर्देश दिले. (हेही वाचा, NASA च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा; मुंबईसह भारतातील 12 किनारपट्टीची शहरे जाणार पाण्याखाली, जाणून घ्या कारण)

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मदत आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार हमीरपुर, फर्रुखाबाद, आगरा, बलिया, मिर्जापुर, गोरखपुर, सीतापुर, मऊ, लखीमपुर खीरी, शाहजहांपुर, बहराइच, गोंडा, कानपुर नगर, फतेहपुर, बांदा, इटावा, जालौन, वाराणसी, कौशांबी, चंदौली, हाजीपुर, औरैया, कानपूर,देहात आणि प्रयागराज आदींसह 605 गावे पूरग्रस्त झाली आहेत.

एएनआय

केंद्रीय जल आयोग ने दिलेल्या अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे गंगा, यमुना, शारदा, बेतवा आणि क्वानो नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगा नदी बदायूं येथील कचला ब्रिज, प्रयागराज येथील फाफामऊ, प्रयागराज, मिर्जापुर, वाराणसी, गाजीपुर तथा बलियामध्ये धोकादायक पातळी ओलांडून गेले आहेत.