सरकारी कर्माचाऱ्यांनी ऑफिसात सकाळी 9 वाजता हजेरी लावावी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी 9 वाजता ऑफिसात हजेरी लावावी असे आदेश उत्तर प्रदेशचे (uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिले आहेत. कारण सरकारी कर्मचारी बहुतांश वेळा कामावर उशिरा येतात आणि लवकर निघून जातात अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्यावर चाप बसावा म्हणून असा आदेश देण्यात आला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी सकाळी 9 वाजता काहीही करुन कामावर हजेरी लावावी असे सांगितले आहे. मात्र जर नियमांचे उल्लंघन केल्यास त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान काही कर्मचारी जेवणाच्या वेळेतसुद्धा टाईमपास करत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे काम कमी आणि टाईमपास जास्त असे सरकारी कर्मचारी करतात. यामुळे नागरिकांना सरकारी कामांसाठी तात्कळत बसावे लागते. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेत या असे आदेश दिला आहे.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकरणातील गोलंदाजीमुळे विरोधी पक्षांची दांडी गुल, भाजपचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)

यापूर्वी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांनी घरुन काम न करता कार्यालयात हजर रहावे अशी तंबी दिली होती. त्यानंतर बहुतांश मंत्र्यांनी मोदी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन सुद्धा करत आहेत.