गॅस सिलिंडर स्फोट (Cylinder Blast) होऊन दुमजली इमारत कोसळल्याने 10 जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मुहम्मदाबाद येथील होगना परिसरातील मऊ (Mau) येथे सोमवारी सकाळी घडली. घरातील महिला स्वयंपाकघरात सकाळचा नाश्ता बनवत होती. दरम्यान, अचानकपणे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या भयानक स्फोटात दुमजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जागेवरच कोसळली. तसेच, परिसरातील इतर इमारतींनाही या स्फोटाचा तडाका बसला. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणी बजाव कार्य सुरु असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार या घटनेत 10 लोक ठार तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगितले जात आहे की, वलीदपूर निवासी छोटू बढई यांच्या घरात सकाळी सात वाजता ही घटना घडली. सुरुवातीला गॅस सिलिंडर स्फोट होण्यापूर्वी सिलिंडरला आगोदर आग लागली. त्यानंतर सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज येताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनास्थळी दाखल झालेले लोक उत्सुकतेपाटी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, इमारतच जमीनदोस्त झाली.
दरम्यान, शैलेश वर्मा पुत्र रामाश्रय ( वय-32), रामबालक मद्धेशिया पुत्र केशव (वय-57), रीना पुत्री कन्हैया (वय-22), मोना पुत्री छोटू (वय-20), सुनीता पत्नी भिर्गु नाथ (वय-30), ममता पुत्री कन्हैया (वय-22), सोनम पुत्री कन्हैया (वय-21), चमेली पत्नी स्वर्गीय नारायण (वय-50), सुभावती पत्नी स्वर्गीय खेदु (वय-58), रामरति पत्नी सत्यप्रकाश (वय-50), अजीत पुत्र भिर्गु नाथ उम्र (वय-8), अर्चना पुत्री बिरजू (वय-15), संजना पुत्री स्वर्गीय छोटू (वय-16), इंद्रावती पत्नी दूधनाथ (वय-45) यांच्यासह इतर 30 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, लवकरच भारतात उपलब्ध होणार ब्लास्ट प्रुफ सिलिंडर; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ठ्ये)
एएनआय ट्विट
#UPDATE Death toll in Mau cylinder blast case rises to 12 https://t.co/dtLp9w8YuK
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2019
इमारत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीत असलेल्या नागरिकांच्या किंकाळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. सरकारी प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच सरकारी फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यातील पाच जणांचा उपचारासाठी दाखल करत असतानाच मृत्यू झाला.