NDA Exam 2021 मध्ये महिला उमेदवारांना सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या Interim Order जारी
Supreme Court | (Photo Credit: ANI)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (18 ऑगस्ट) महिला उमेदवारांना UPSC NDA Examination मध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. यंदा National Defence Academy examination 5 सप्टेंबर 2021 दिवशी होणार आहे. या परीक्षेला आता महिला बसू शकतात. दरम्यान अंतिम प्रवेश हा कोर्टाच्या अंतिम निकालावर अवलंबून राहणार आहे. नक्की वाचा: कौतुकास्पद! मराठमोळ्या मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल पदावर बढती.

न्यायाधीश संजय कौल आणि हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने आज Kush Kalra या महिला परीक्षार्थीने एनडीएच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी सादर केलेल्या writ petition वर निर्णय दिला आहे. त्यांनी interim order पास केली आहे. यूपीएससी कडून दरवर्षी National Defence Academy examination घेतली जाते.

दरम्यान देशामध्ये महिलांना एनडीए च्या परीक्षेपासून दूर ठेवणं हा त्यांच्यासोबतचा भेदभाव असल्याचं मत कोर्टाने नोंदवलं आहे आणि सरकारने यावरून त्यांच्या प्रक्रियेमध्ये बदल करावेत असे देखील सुचवले आहे. अर्जात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमध्ये संविधानाच्या कलम 14,15,16,19 चे उल्लंघन होत आहे. सध्याच्या नियमावली नुसार एनडीए च्या परीक्षेसाठी उमेदवार अविवाहित पुरूष असावा असं म्हटलं आहे. यामुळे महिलांना इच्छा असूनही त्यामध्ये सहभागी होता येत नाही.

सध्या न्यायालयामध्ये नॅशनल डिफेंस अकॅडमी, नेवल अकॅडमी एक्झाम आणि एनडीए मध्ये ट्रेनिंग साठी महिलांना पात्रता निकष मिळावेत यासाठी झगडा सुरू आहे. याप्रकरणी 10 मार्च दिवशी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सरकारला नोटीस पाठवली होती.