
वाढती महागाई आणि घटत्या जमिनीमुळे लोकसंख्या नियंत्रणावर भर दिला जात आहे. विविध घोषणा आणि मोहिमांद्वारे लोकांना फक्त दोन मुले असावीत याची जाणीव करून दिली जात आहे. जेव्हा जास्त मुले असतात तेव्हा लोक सर्व मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याकडे समान लक्ष देऊ शकत नाहीत. मात्र, सर्व प्रयत्न करूनही, आजही असे लोक आहेत ज्यांना याबद्दल माहिती नाही. त्याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर (Hapur) जिल्ह्यात दिसून आले. येथे नुकतेच 50 महिलेने 14 व्या मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. महिलेचा मोठा मुलगा 22 वर्षांचा आहे तर सर्वात धाकटा मुलगा 3 वर्षांचा आहे.
आता या 14 व्या मुलाच्या जन्माची संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. हापूरमधील पिलखुवा कोतवाली भागातील मोहल्ला बजरंगपुरी येथील रहिवासी इमामुद्दीन आणि पत्नी गुडिया यांनी या 14 व्या मुलाला जन्म दिला आहे.
UP Woman Gives Birth to 14th Child:
हापुड़: इमामुद्दीन की पत्नी गुड़िया ने 50 साल की उम्र में 14वें बच्चे को जन्म दिया#viralvideo | Viral Video | #Hapur pic.twitter.com/5zmQhJCoDl
— News24 (@news24tvchannel) March 30, 2025
इमामुद्दीन म्हणाले की, गुरुवारी पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला पिलखुवा येथील सरकारी सीएचसी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून तिची गंभीर प्रकृती पाहून तिला हापूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. गुडियाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले जात असताना तिने रुग्णालयाच्या गेटवर सरकारी रुग्णवाहिकेतच तिने मुलीला जन्म दिला. यानंतर, रुग्णालयात उपस्थित आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी गुडियाला स्ट्रेचरवर आतमध्ये नेले. दुसऱ्या दिवशी, आई आणि बाळ दोघांनाही डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. (हेही वाचा: OMG! शस्त्रक्रियेनंतर तब्बल 17 वर्षांपासून महिलेच्या पोटात राहिली कात्री; एक्स-रे केल्यानंतर उघडकीस आली धक्कादायक बाब, डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल)
गर्भवती महिलेच्या 22 वर्षीय मोठ्या मुलाने सांगितले की, सध्या आम्ही 11 भावंडे आहोत. तीन मुलांचा आधीच मृत्यू झाला आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर, कुटुंबातील सदस्यांनी 14 मुले असल्याचे वृत्त फेटाळले असून, त्यांना 12 मुले असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुडियाचा पती इमामुद्दीन हा मजूर आहे तर मोठा मुलगा साहिल वेल्डिंगचे काम करतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत आहे.