Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका व्यक्तीवर लघवी करतानाचा (Urinating)व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. पण आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथून समोर आले आहे. आग्रा येथे गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. यानंतर एकाने त्याच्या चेहऱ्यावर लघवी केली व याचा व्हिडिओही बनवला. सोमवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत कारवाई केली.

आग्रा येथे एका व्यक्तीवर लघवी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. डीसीपी सूरज राय, म्हणाले, 'आग्रा येथे एका व्यक्तीवर लघवी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे आमच्या निदर्शनास आला. याबाबत पीडितेने तक्रार दाखल केली नाही. मात्र पोलिसांनी स्वत: या प्रकरणांची दखल घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 307 आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. हा व्हिडिओ 2-3 महिन्यांपूर्वीचा असल्याचे कळते. याबाबत मुख्य आरोपी आदित्यला अटक करण्यात आली आहे.'

राय यांनी सांगितले की, आरोपी आदित्यच्या चौकशीत तो फतेहपूर सिक्रीच्या उंडारा येथील एका हिस्ट्रीशीटरचा साथीदार असल्याचे आढळून आले. हिस्ट्री शीटरवर 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याने खेरागडमध्ये दरोडा आणि चोरी केली होती. आदित्यचा पिडीत व्यक्तीसोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. (हेही वाचा: Man Crushes Rat To Death: बाईकच्या चाकाखाली उंदराला चिरडून मारले; आरोपीवर पोलिसांची कारवाई)

दरम्यान, याआधी 4 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सिधी येथे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक तरुण दुसऱ्या व्यक्तीवर लघवी करताना दिसत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला अटक केली आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवला.