UP: लग्नानंतर महिलेचे सुरु झाले अफेअर, घरातल्या मंडळींसोबत मिळून केला प्रियकराचा पत्ता कट
Death (Photo Credits-Facebook)

UP: उत्तर प्रदेशतील नोएडा येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची घरातल्या मंडळींसोबत मिळून हत्या केली. हे प्रकरण सूरजपुर ठाणे क्षेत्रातील पाली गावातील आहे. पोलिसांनी असे सांगितले की, या मध्ये दोन महिलांसह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढे असे म्हटले की, ही घटना 1 मार्च रोजीची आहे. सुरजपूर ठाणे क्षेत्रातील पाली गावात राहणारा रोबिन याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकला. रोबिन याला प्रथम आरोपी प्रेयसी मोनिका हिच्या आईने त्याला कामाच्या बहाण्याने घरी बोलावले. तेथेच त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतक रोबिन याचा मृतदेह आरोपी प्रेयसीच्या भावांनी नाल्यात फेकला.

मृत रोबिन याच्या नातेवाईकांनी असे म्हटले की, 27 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता तो घराबाहेर गेला आणि परत आलाच नाही. सकाळ पर्यंत त्याचा शोध नातेवाईकांनी घेतला पण त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर मोनिका हिच्या घरी फोन केला. परंतु तेव्हा मोनिकाच्या घरातील मंडळींनी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हाच रोबिन याच्या नातेवाईकांना त्यांच्यावर संशय आला. रोबिन याच्या काकांनी नंतर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार केली.(Suicide: मोहालीत मित्रासोबत भांडण झाल्याच्या कारणावरून 19 वर्षीय मुलीची आत्महत्या, तरूणाचा शोध सुरू)

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणी तपास सुरु केला असता तेव्हा हत्येचा खुलासा झाला. आरोपींनी असे म्हटले की, मोनिका आणि रोबिन यांचे अफेअर होते. परंतु याच दरम्यान मोनिका हिचा दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह झाला. तरी सुद्धा ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. जेव्हा मोनिका गेल्या आठवड्यात आपल्या माहेरी आली तेव्हा ती रोबिन याला भेटू लागली. याबद्दल जेव्हा मोनिकाच्या सासरच्या मंडळींना कळली तेव्हा त्यांनी रोबिनचा काटा काढण्याचे ठरवत त्याच्या हत्येचा कट रचला.

डीसीपी सेंट्रल हरीश चन्दर यांनी असे म्हटले की, जेव्हा मोनिका हिच्या घरातील मंडळींची चौकशी केला असता तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत अधिक कठोर पद्धतीने वागणूक केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. सध्या मृत रोबिन याचा मृतदेह आणि त्याचे सामान जप्त केले आहे. त्यानुसार आता पुढील कारवाई पोलिसांकडून केली जात आहे.