
उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election 2022) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. त्यामुळे उर्वरीत टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार गतीमान केला आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि उमेदवारांची जोरदार चर्चा सुरु आहे. लखनऊ मध्य मतदारसंघातून समाजवादी (Samajwadi Party) पक्षाच्या उमेदवाराचीही अशीच चर्चा सुरु आहे. रविदास मेहरोत्रा असे या उमेदवाराचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे 250 वेळा हे उमेदवार महोदय तुरुंगवारी करुन आले आहेत.
रविदास मेहरोत्रा यांना विचारले असता ते सांगतात की ते जयप्रकाश यांच्या आंदोलनाचाही भाग राहिले आहेत. जेव्हा देशात आणिबाणी लागू होती तेव्हा ते जेलमध्ये गेले होते. पूर्ण 20 महिने ते जेलमध्येच होते. आणिबाणीत जेलमध्ये जाऊन आल्यानतर पुढेही ते 250 वेळा जेलमध्ये गेल्याचे सांगतात. त्यांनी म्हटले आह की, मी नेहमीच पुढे राहिलो आहे. अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी नेहमीच आवाज उठवला आहे. जेव्हा जेव्हा सरकारने महागाईत वाढ केली आहे तव्हा तेव्हा मी त्याचा जोरदार विरोध केला आहे. पाठिमागील पाच वर्षांमध्ये अनेक वेळा माझ्यावर लाठीमार झाला आहे. मी सीएए विरुद्ध आंदोलनातही तुरुंगात जाऊन आलो आहे. तुरुंगात जाण्याचा विश्वविक्रम केल्याचेही ते सांगतात. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणी आशिष मिश्रा याला जामीन मंजूर)
रविदास मेहरोत्रा हे या आधी दोन वेळा आमदार राहिले आहेत. पाठिमागच्या वेळी ते अवघ्या 2600 मतांनी पराभूत झाले होते. आज रोजी त्यांच्यावर 22 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी म्हटले की, हे सर्व गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. मी कधीही कोणाशी भांडण केले नाही. कधीही कायदा हातात घेतला नाही. मला केवळ लोकांसाठी तुरुंगात जावे लागले.