प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) बोर्ड परिक्षा संपल्या आहेत. तसेच बोर्ड परिक्षेचा (Board Exam) निकाल कधी लागणार याबद्दल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तत्पूर्वी बोर्ड परिक्षेच्या अधिकाऱ्याने असे सांगितले आहे की, एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC) बोर्ड परिक्षेचा निकाल एप्रिल महिन्याचा शेवटी जाहीर केला जाणार आहे.

यंदाच्या वर्षी युपी मध्ये बोर्ड परिक्षेच्या वेळी कॉपी करण्याच्या प्रकाराला आवर घालण्यासाठी उपाय करुन ही विविध गोष्टी उत्तर पत्रिकेतून दिसून येत आहेत. इस्लामिया इंटर कॉलेजमध्ये इंग्रजी पेपरच्या उत्तर प्रत्रिकेत असे दिसून आले आहे की, विद्यार्थिनीने जे काही उत्तरपत्रिकेत लिहिले आहे ते वाचून शिक्षक संभ्रामात पडला आहे. शिक्षकाने असे सांगितले की, इंग्रजी पेपरच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थिनीने अपील केले असून मुलाकडच्या घरातील मंडळींना बोर्ड परिक्षा पास झालेली बायको मुलासाठी हवी असल्याचे म्हटले आहे. परंतु नापास झाल्यास लग्न होणार नाही अशी ही सूचना विद्यार्थिनीने त्यामध्ये लिहिली आहे.(हेही वाचा-HSC Board Exam 2019: मुंबई मध्ये Nishka Hosangady देणार iPad वर बारावीची परीक्षा)

या विद्यार्थिनीने उत्तर पत्रिकेत आई खुप अवस्थ असल्याने मी परिक्षेचा अभ्यास व्यवस्थित करु शकली नाही. त्यामुळे तुम्ही मला पास करा असे या विद्यार्थिनीने उत्तर पत्रिकेतून म्हटले आहे.