Up Board Results (Photo Credits-File Image)

UP Board 12th and 10th Results 2019: उत्तर प्रदेशातील 12वी आणि 10वी बोर्ड परिक्षेचा निकाल उद्या (27 एप्रिल) जाहीर होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थी परिक्षा झाल्यानंतर निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते. तर उद्या निकाल जाहीर होणार असून तो बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांना बोर्ड परिक्षेचा निकाल मेसेजद्वारे सुद्धा पाहण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. तर बोर्ड परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील सूचना लक्षात ठेवा.

-मोबाईलद्वारे बोर्ड परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी UP12 ROLL NUMBER टाईप करुन 56263 या क्रमांवर मेसेज पाठवावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल पाहता येणार आहे.

-तर दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी UP10 ROLL NUMBER टाईप करुन 56263 या क्रमांवर मेसेज पाठवावा लागणार आहे.

(Maharashtra Board HSC Results 2019: मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता)

-तर मोबाईलवर अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी ‘U.P. Board Results 2019’ हा अ‍ॅप डाऊनलोड करावा लागणार आहे. या अ‍ॅपसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहेत.

तर युपी 12 वी बोर्ड परिक्षेसाठी एकूण 26,11,319 विद्यार्थी बसले होते. तर 7 फेब्रुवारीला ही परिक्षा सुरु झाली होती.