अश्लील व्हिडिओ (Porn Videos) पाहून त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या जोडप्यांच्याबद्दल आपण ऐकले असेल. आता अलीगढमधील (Aligarh) क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरात असेच एक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीवर अश्लील व्हिडिओ पाहून अनैसर्गिक संबंध (Unnatural Sex) ठेवल्याचा आरोप केला आहे. याबाबत महिलेने एसएसपी कार्यालयात तक्रार केली आहे. फर्स्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.
महिलेने सांगितले की, वर्षभरापूर्वी तिचे लग्न झाले आहे. तिच्या पतीला पॉर्न क्लिप आणि व्हिडिओ पाहण्याची सवय आहे. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर तो क्लिप्समध्ये दाखवल्याप्रमाणे अनैसर्गिक सेक्ससह इतर अनेक गोष्टी करण्याची मागणी तिच्याकडे करत आहे. महिलेचा दावा आहे की, पती तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडतो आणि नंतर तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स करतो.
याबाबत तिने तिच्या सासू-सासऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीही पतीला पाठिंबा दिल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, तिने तिच्या पतीला अशा प्रकारच्या सेक्ससाठी नकार देऊन त्याची मागणी मान्य न केल्याने सासूने व दिराने आपल्याला मारहाण केली. पतीच्या तापट स्वभावाबद्दल नमूद करताना महिला म्हणाली, तिचा पती तिला पूर्वी दिल्लीला घेऊन गेला होता. तेथे तिने त्याला एखादा व्यवसाय करण्यास सांगितले असता, त्याने तिला मारहाण केली. (हेही वाचा: Wife Swapping: 'वाईफ स्वॅपींग'साठी पत्नीचा नकार, चिडलेल्या पतीकडून बेदम मारहाण आणि अनैसर्गीक सेक्स, पोलिसांत गुन्हा दाखल)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित महिलेच्या आईने दावा केला आहे की, तिच्या मुलीला पती अश्लील चित्रपट दाखवतो, त्यानंतर व्हिडिओमध्ये दर्शविल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. कथितरित्या, आईने असाही दावा केला आहे की, तिच्या मुलीच्या सासूने तिला तिचा पती सांगेल तसे वागण्याचा सल्ला दिला. आईने असेही नमूद केले की, लाजेमुळे आपल्या मुलीने या गोष्टी कोणाला सांगितल्या नाहीत, परंतु आता असहाय्य झाल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सीओ-3 कडे सोपवण्यात आला असून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.