Bhojpur Gun Factory Busted: बिहार पोलिसांनी भोजपूर जिल्ह्यात एका गावात सुरु असलेल्या बंदुकांच्या अवैद्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. कारखान्याच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी या बाबत रविवारी माहिती दिली. भोजपूरचे एसपी प्रमोद कुमार यादव यांनी माहिती दिली. (हेही वाचा- व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेऊन केली अटक; खार पोलिसांचे धक्कादायक दुष्कृत्य CCTV मध्ये कैद, चार अधिकारी निलंबित (Video)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या बराच दिवसांपासून गावात अवैद्य कारखाना सुरु होता. नया भोजपूर पोलिस स्टेशन अंतर्गत चांदा गावात वीरेंद्र कुमार यांच्या घरात बंदुकीच्या कारखान्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी घरावर छापा टाकला. एपडीपीओ अफाक अख्तर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. पथकाने परिसरात छापा टाकून माहिती गोळा केली. पोलिसांनी सात आरोपींना अटक केले. मात्र, काही जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
पोलिसांनी छाप्यादरम्यान, छाप्यादरम्यान एक पिस्तूल, 35 टायगर प्लेट्स, 36 कॉर्क रॉड, 33 बॅरल, 20 बट्स, तीन ड्रिल मशीन, एक लेथ मशीन, एक ग्राइंडर आणि तीन मोबाईल फोन जप्त केले. वीरेंद्र कुमार श्रीवास्तव, पिंटू शाह, मोहम्मद आझाद, मोहम्मद मोनू, मोहम्मद अब्दुल, मोहम्मद राजू आणि मोहम्मद इक्बाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र श्रीवास्तव हा मिनी गन फॅक्टरी चालवण्याचा मास्टरमाईंड आहे.