अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ) मुंबईत युनिटेक समूहावर (Unitech Group) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुंबई येथून या समूहाची संपत्ती असलेले 101 भूखंड आणि एक हेलिकॉप्टर (Helicopter) अशी सुमारे 81 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी पीएमएलए प्रकरणात या समूहाची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान ही कारवाई केल्याचे ईडी (ED) कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून बुधवारी (23 जून) सांगितले. अशी माहिती आहे की, जप्त करण्यात आलेले भूखंड हे मुंबई येथील सांताक्रूज परिसरात आणि शिवालिका समूहाचे आहेत.
जप्त करण्यात आलेले हेलिकॉप्टर मेसर्स किं रोटर्स एअर चार्टर्स प्रायव्हेट चे आहे. जे शिवालिक समूहाच्या एका संलग्न कंपनीचे आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आलेल्या चौकशीत पुढे आले की यूनिटेक ग्रुपने चुकीच्या पद्धतीने शिवालिक समूहाला 574 कोटी रुपये दिले. शिवालिक समूहाच्या संस्थांनी या पैशांनी भूखंड आणि हेलिकॉप्टर खरेदी केले. (हेही वाचा, Builder Avinash Bhosale: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, इडीची कारवाई)
ईडी ट्विट
ED has provisionally attached 101 land parcels and 1 helicopter worth Rs. 81.10 Crore in relation to the investigation being conducted against Unitech Group.
— ED (@dir_ed) June 23, 2021
दरम्यान, 4 मार्च ला ईडीने एनसीआर आणि मुंबई येथे शिवालिक ग्रुप, त्रिकार ग्रुप, यूनिटेक ग्रुप आणि कार्नौस्टी ग्रुपच्या परिसरात 35 ठिकाणांवर चौकशी केली होती. अनेक लोकांशी चौकशी केल्यानंतर या संपत्तीबाबत माहिती मिळाली. या आधी ईडीने त्रिकार समूह आणि कार्नौस्टी समूहाशी संबंधीत 349.82 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त केली होती. या जप्तीसोबतच या प्रकरणात एकूण जप्ती 431 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया अद्यापही सुरु आहे.