केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी, अन्यथा अंदोलन करू- मिलिंद एकबोटे

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी गो-हत्या संदर्भात एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची हक्कालपट्टी करा, अशी मागणी एकबोटे यांनी केली आहे. तसेच रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याविरोधात येत्या गुरुवारी अंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मिलिंद एकबोटे यांच्या या विधानावर अद्याप दानवेची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेदरम्यान, मी असेपर्यंत खुशाल गायी कापा असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. यासंदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. यावर मिलिंद एकबोटे यांनी आक्षेप नोंदवला असून रावसाहेब दानवे यांनी या वक्तव्याबदल माफी मागावी अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी एकबोटे यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर रावसाहेब दानवे यांनी माफी न मागितल्यास गुरुवारी यांच्या विरोधात अंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा-तिकिट का कापलं? हे विचारण्यासाठी विनोद तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली - अजित पवार.

"रावसाहेब यांच्यावर यांनी कसाईंच्या एका सभेत जेवढी कापायची तेवढी कापा असे वक्तव्य केले आहे. हे गो-हत्येला प्रोस्ताहन देणारे वक्तव्य त्यांच्या सारख्या माणसाने देणे अपेक्षित नव्हते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त अशी प्रतिक्रिया येत आहेत. तसेच रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी अंदोलन करणार", असे मिलिंद एकबोटे लोकसत्ता वृतांशी बोलताना म्हणाले आहे.