Loan Guarantee Scheme: COVID-19 प्रभावीत क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपायंची कर्ज हमी योजना, केंद्री अर्थमंत्री Nirmala Sitharaman ​यांची घोषणा
Nirmala Sitharaman | (Photo Credits- Twitter)

कोरोना व्हायरस महामारीत फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रत्न केला. हा दिलासा देताना केंद्र सरकारने काही उपायजोना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (28 जून) पत्रकार परिषदत या घोषणा जाहीर केल्या. विविध क्षेत्रांसाठी 1.1 कर्ज हमी योजना (Loan Guarantee Scheme) आणि इतर 8 उपाययोजना जाहीर केल्या आहेत. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना व्हायरस महामारीचा फटका बसलेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांच्या कर्ज हमी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत एकट्या आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटी दिले जाणार आहेत. उर्वरीत क्षेत्रांसाठी 60,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कर्जासाठी ठेवण्यात आली आहे. या कर्जासाठी अधिकाधिक व्याजदर 7.95% इतका असणार आहे. इतर क्षेत्रांसाठी हाच व्याजदर अधिकाधिक 8.25% इतके असणार आहे.

निर्मला सीतारमण यांनी या वेळी क्रेडीट गॅरेंटी योजनेचीही या वेळी घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून 25 लाख लोकांना मायक्रो फायनान्स इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून फायदा मिळेल. छोट्या कर्जधारकांना याचा फायदा मिळणार आहे. ही योजना सर्वात आधी मे 2020 मध्ये आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत देणयात आली होती.

पर्यटन क्षेत्रासाठीही मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 11,000 यात रजिस्टर्ड टूरिस्ट गाईड्स, ट्रॅव्हल आणि पर्यटनासाठी स्टेकहोल्डर्डसना आर्थिक सहाय्य मिळणार आहेत. मान्यताप्राप्त गाईड्सना 1 लाख रुपयांपर्यंत आणि मान्यता प्राप्त ट्रॅव्हल आणि टुरिजमच्या स्टॅकहोल्डर्ससाठी 10 लाख रुपयांपर्यंत 100% हमी कर्ज मिळेल.

पाच लाख पर्यटकांना फ्री टूरिस्ट व्हीसा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विदेशी पर्यटकांना जेव्हा व्हिसा मिळणे सुरु होईल तेव्हा पहिल्यांदा जे 5 लाख पर्यटक भारतात येतील त्यांना फ्री व्हीसा मिळेल. ही योजना केवळ भारतात येणाऱ्या पहिल्या 5 लाख पर्यटकांसाठीच मर्यादीत असेल. ही योजना 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहील. ही योजना याहीआदी कार्यरत होती.