केंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंह आज सकाळी 10 वाजता करणार महत्वाची घोषणा, रक्षा मंंत्रालयची ट्विट वरुन माहिती
Rajnath Singh (Photo Credits: ANI)

देशाचे केंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंह (Union Defence Minister Rajnath Singh) हे काहीच वेळात सकाळी 10 वाजता एक महत्वाची घोषणा करणार असल्याचे समजत आहे. ही घोषणा नेमकी कशाच्या संदर्भात असेल याबाबत माहिती समोर आलेली नाही, काही वेळापुर्वी रक्षा मंंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरुन या बाबत माहिती देण्यात आली. रक्षा मंंत्रालयाच्या ट्विट मध्ये म्हंटल्यानुसार आज राजनाथ सिंह अत्यंत मोठी आणि महत्वाची घोषणा करणार आहेत असे समजत आहे. याबाबत सध्या कुतुहुल पाहायला मिळत असुन अवघ्या 30 मिनिटात आता याचे उत्तर मिळेल. या संदर्भातील अपडेट जाणुन घेण्यासाठी लेटेस्टली मराठीचे पेज फॉलो करत राहा.

राजनाथ सिंह यांंचे भाषण संरक्षण मंंत्रालयाच्या व त्यांच्या स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरुन लाईव्ह दाखवण्यात येईल.

Defence Ministry Tweet

मागील काही काळात निर्माण झालेल्या भारत- चीन युद्धजन्य परिस्थितीला आटोक्यात आणुन काल सुद्धा दोन्ही देशाच्या अधिकार्‍यांमध्ये एक बैठक पार पडली, या परिस्थीतीची माहिती देणारी आजची घोषणा असु शकते, किंंवा दुसरीकडे यंंदाचा स्वांंतत्र्य दिन सुद्धा काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने करण्यात येणार्‍या सुरक्षेबाबत संंरक्षण मंंत्री बोलणार का असेही अंदाज बांधले जात आहेत.