केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) पुढच्या महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 या दिवशी 2021/22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर करतील. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट, शेतकरी आंदोलन, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी अशा एक ना अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर होत असताना आपण लाईव्ह (Union Budget 2021 LIVE Streaming) पाहू शकता. सहाजिकच हा अर्थसंकल्प आपण कोठे पाहू शकता याबाबत उत्सुकता असेल. म्हणूनच घ्या जाणून.
संसदेच्या लोकसभा या कनिष्ठ सभागृहात अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. सादरीकरण सुरु असताना आपण हा अर्थसंकल्प आपण लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही आणि दूरदर्शन यांसारख्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहू शकता. याशिवाय या अर्थसंकल्पाचे लाईव्ह स्ट्रमिंग पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.
निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असे की, हे बजेर पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. त्यामुळे या बजेटची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीही निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी अर्थसंकल्प सादर केला होता. या वेळी त्यांनी प्रदीर्घ भाषण ठोकले होते. जे तब्बल 2 तास 41 मिनीटे चालले.
दरम्यान, पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली आहे. अर्थसंकल्प पेपरयुक्त करायचा असल्यास त्याला मनुष्यबळही मोठ्या प्रमाणावर लागते आणि खर्चही त्या पटीत होतो. एक वर्षाचा अर्थसंकल्प पेपरयुक्त करायचा असेल तर त्यासाठी जवळपास पंधरवडाभर सुमारे 10 लोक कार्यरत राहतात. या सर्वांना मुद्रणासाठी थांबून राहावे लागते. अर्थसंकल्प छापून तयार होईपर्यंत, त्यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत आणि तो संसदेत सादर होईपर्यंत त्याचे काम सुरु राहते. अशा वेळी वेळेचा अपव्यवय होतो. यावर पेपरलेस अर्थसंकल्प हा विशेष फायदेशीर ठरणार आहे.